Virat Kohli Celebration After Nehal Wadhera Run Out : पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रंगलेल्या आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील ३७ व्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाब किंग्जच्या सलामी जोडीनं दमदार सुरुवात केली. पण सलामी जोडी तंबूत परतल्यावर कर्णधार श्रेयस अय्यरसह अन्य फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. संघ अडचणीत असताना नेहल वढेरा आणि जॉश इंग्लिस या जोडीमध्ये ताळमेलाचा अभाव दिसला. नेहल वढेरा अवघ्या ५ धावा करून तो धावबाद होऊन तंबूत परतला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
किंग कोहलीनं असा व्यक्त केला विकेटचा आनंद
विराट कोहली आणि टिम डेविड यांनी मिळून रॉयल चॅलेंजर्सच्या संघाला नेहल वढेराच्या रुपात एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली. नेहल वढेरा याला धावबाद केल्यावर किंग कोहलीचे सेलिब्रेशन बघण्याजोगे होते. RCB च्या स्टार क्रिकेटरच्या स्टायलिश अँण्ड कूल सेलिब्रेशनची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. गॉगल नाचवत त्याने या विकेटचे सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. एका बाजूला सीमारेषेवरून थ्रो केल्यावर टिम डेविड डोळ्यांवर लावलेला सनग्लास काढून सेलिब्रेशनसाठी आपल्या संवगड्यांकडे येताना दिसला. दुसरीकडे विकेटचा डाव साधल्यावर कॅपच्या मागच्या बाजूला स्टायलिश अंदाजात अडकवलेला गॉगल काढून तो फिरवत कोहलीने हटके स्टाइलमध्ये विकेटचे सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले.
वैभव सूर्यवंशीच्या धडाकेबाज खेळाने गुगलचे सीईओही भारावले, सुंदर पिचाई कौतुक करत म्हणाले, "वयाच्या १४ व्या वर्षी...
दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डवर, किंग कोहलीनं साधला डाव
पंजाब किंग्जच्या डावातील नवव्या षटकात सूयश शर्मा गोलंदाजी करत होता. या षटकातील अखेरच्या चेंडूवर जोस इंग्लिस याने मारलेला चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावरुन सरळ गेला. जोश अन् नेहल यांनी पहिली धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी नेहल वढेरा नॉन स्ट्रइकला पोहचाला त्यावेळी जोश इंग्लिस तिथेच होता. टीम डेविडनं चपळाईनं चेंडूवर येत नॉन स्ट्राइकवर असलेल्या विराटकडे फेकला. मग विराटने विकेट किपर जितेशकडे थ्रो करत नेहल वढेरा याला धावबाद केले. या विकेटनंतर विराट कोहलीने खास अंदाजात सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले.
Web Title: IPL 2025 PBKS vs RCB 37th Match Virat Kohli's Gesture At Nehal Wadhera After Epic Run Out Breaks The Internet Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.