सनरायझर्स हैदराबादच्या संघाने लखनौ सुपर जाएंट्स विरुद्धच्या सामन्यात विदर्भकर हर्ष दुबे याला पदार्पणाची संधी दिली. पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर पॅट कमिन्स याने दुसऱ्याच षटकात चेंडू लेग स्पिनर बॉलिंग ऑलराउंडर असलेल्या हर्षच्या हाती सोपवला. पण इशान किशनमुळे पदार्पणाचा सामना अविस्मरणीय करण्याची त्याची संधी हुकली. पहिल्याच चेंडूवर त्याने मिचेल मार्शला आपल्या जाळ्यात अडकवले होते. पण इशान किशन याने त्याचा कॅच सोडला. त्यानंतर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर हर्षनं मार्करमला चकवा दिला. यावेळीही इशान किशननं स्टंपिंगची संधी गमावली. जर या दोन विकेट्ससाठी इशानने विदर्भकराला साथ दिली असती तर लखनौचा संघ अडचणीत सापडला असता. याशिवाय हर्षचं पदार्पणही एकदम झोकात झाले असते. पण इशानच्या एक नाही तर दोन चुकांमुळे त्यावर पाणी फेरले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
११ धावांवर इशाननं सोडला होता मार्शचा कॅच, मग...
हर्ष दुबेनं पदार्पणाच्या सामन्यात ४ षटकात ४४ धावा खर्च करताना शेवटी एक विकेट घेतली. मिचेल मार्शच्या रुपात त्याला आयपीएलमधील पहिली विकेट मिळाली. ६५ धावांवर मार्शचा इशान मलिंगा याने झेल टिपला. हर्षच्या पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर इशान किशन याने त्याचा कॅच सोडला त्यावेळी तो फक्त ११ धावांवर खेळत होता.
RCB नं केली MI ची बरोबरी, पण... यंदा टॉपरसह सर्वाधिक वेळा प्लेऑफ्स खेळणारे ३ संघ ठरले फेल
मार्करमनं स्टंपिगच्या रुपात मिळालेल्या संधीचं केलं सोनं
हर्ष दुबेच्या दुसऱ्या षटकात एडन मार्कम पुढे येऊन फटका मारताना फसला. पण विकेट मागे इशान किशनला चेंडू काही सापडला नाही. परिणामी मार्करमला आपली इनिंग फुलवण्याची एक संधी मिळाली. ६ धावांवर इशानने त्याला जीवनदान दिले. या संधीचं सोनं करताना मार्करमनं अर्धशतक झळकावत संघाला मजबूत सुरुवात करून दिली.
कोण आहे हर्ष दुबे?
हर्ष दुबे हा लेफ्ट आर्म लेग स्पिनर आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भ संघाकडून त्याने आपल्या फिरकीतील जादू दाखवून दिलीये. रणजी क्रिकेटच्या एका हंगामात सर्वाधिक ६९ विकेट्स घेण्याचा मोठा रेकॉर्ड त्याच्या नावे आहे. या कामगिरीच्या जोरावरच इंग्लंड विरुद्धच्या दौऱ्या भारतीय 'अ' संघातही त्याला संधी मिळाली आहे. या दौऱ्यावर जाण्याआधी सनरायझर्स हैदराबादच्या संघाने ३० लाख रुपयांसह त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. लखनौ विरुद्ध त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधीही दिली.
Web Title: IPL 2025 LSG vs SRH Ishan Kishan Dropped Catch Of Mitchell Marsh And Missed An Easy Stumping Of Aiden Markram SRH Debutant Harsh Dubey Bowling
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.