जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव

पंजाबच्या बरोबरीनं गुण कमावले, पण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 23:54 IST2025-05-27T23:52:19+5:302025-05-27T23:54:38+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 LSG vs RR Royal Challengers Bengaluru won by 6 wkts And Finish Top 2 Jitesh Sharma Mayank Agarawal Hit Show After Virat Kohli Fifty Qualifier 1 PBKS | जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव

जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 Lucknow Super Giants vs Royal Challengers Bengaluru, 70th Match : लखनौच्या इकाना क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने विक्रमी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत प्लेऑफ्समधील अव्वल दोनमधील आपले स्थान पक्के केले आहे. मिचेल मार्शचे अर्धशतक आणि रिषभ पंतच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर लखनौच्या संघाने बंगळुरुसमोर २२८ धावांचे टार्गेट सेट केले होते. आरसीबीच्या संघाने आयपीएलमध्ये एवढे मोठे टार्गेट कधीच पार केले नव्हते.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

दिमाखदार विजयासह RCB चा संघ गुणतालिकेत दुसरा 

पण विराट कोहलीच्या दमदार अर्धशतकानंतर कार्यवाहून कर्णधार जितेश शर्मानं आयपीएलच्या कारकिर्दीतील आपले पहिले अर्धशतक झळकावले. याशिवाय मयंक अग्रवालनं मिळालेल्या संधीच सोनं करून दाखवणारी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने १९ गुण आपल्या खात्यात जमा केले. पण उत्तम धावगतीच्या जोरावर पंजाब किंग्ज संघ अव्वलस्थानी राहिला. दोन्ही संघ आता २९ मे रोजी क्वॉलिफायर वनमध्ये खेळताना दिसली. या निकालासह एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ गुजरात विरुद्ध भिडणार असल्याचे चित्रही स्पष्ट झाले. हा सामना ३० मे रोजी खेळवण्यात येईल. हे दोन्ही सामने मुल्लनपूरच्या  मैदानात खेळवले जाणार आहेत.   

'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
 

मार्शच्या अर्धशतकानंतर रिषभ पंतची दमदार सेंच्युरी

लखनौच्या संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना मिचेल मार्शनं ३७ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीने ६७ धावांची दमदार खेळी केली. त्यानंतर रिषभ पंतनं ६१ चेंडूत ११ चौकार आणि ८ षटकाराच्या मदतीने ११८ धावांची नाबाद खेळी करत निर्धारित २० षटकात ३ विकेट्सच्या मोबदल्यात संघाच्या धावफलकावर २२७ धावा लावल्या होत्या. जोश हेजलवूडच्या अनुपस्थितीत आरसीबीची गोलंदाजी खूपच कमकुवत दिसली. नुवान थुशारा याने २६ धावा खर्च करून एक विकेट घेतली. त्याच्याशिवाय क्रुणाल पांड्यानं २ षटकात फक्त १४ धावा खर्च केल्या. अन्य गोलंदाज चांगलेच महागडे ठरले. भुवनेश्वर कूमार आणि शेफर्ड यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली, पण त्यांनी धावाही अधिक खर्च केल्याचे पाहायला मिळाले.

RCB चा कडक रिप्लाय; किंग कोहलीच्या फिफ्टीनंतर जितेश-मयंक जोडी जमली, अन्...

आयपीएलच्या इतिहासात फक्त दोन वेळा दोनशे पारची लढाई जिंकलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला प्लेऑफ्सच्या टॉप २ मधील स्थान पक्के करण्यासाठी आयपीएलच्या इतिहासातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. विराट कोहली आणि सॉल्ट जोडीनं कडक फलंदाजी करत पहिल्यापासूनच आपले इरादे स्पष्ट केले. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी रचली. फिल सॉल्ट १९ चेंडूत ३० धावांची छोटीखानी पण उपयुक्त खेळी करून परतला. रजत पाटीदार १४ आणि लायम लिविंगस्टोन आल्यापावली परत माघारी फिरल्यामुळे सामना लखनौच्या बाजूनं फिरतोय असं वाटत होते. पण विराट कोहलीनं ३० चेंडूत केलेल्या ५४ धावांची खेळी सार्थ करण्यासाठी मयंक अग्रवाल आणि जितेश शर्मा जोडी जमली. दोघांनी नाबाद राहत १९ व्या षटकातच संघाचा विजय निश्चित केला. मयांक अग्रवालनं २३ चेंडूत ५ चौकाराच्या मदतीने नाबाद ४१ धावांची खेळी केली. जितेश शर्मानं ३३ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ८५ धावांची नाबाद खेळी केली. आयपीएल कारकिर्दीतील त्याचे हे पहिले अर्धशतक ठरले. 

Web Title: IPL 2025 LSG vs RR Royal Challengers Bengaluru won by 6 wkts And Finish Top 2 Jitesh Sharma Mayank Agarawal Hit Show After Virat Kohli Fifty Qualifier 1 PBKS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.