Ajinkya Rahane Record 5000 Runs In IPL : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा फिरकीच्या जाळ्यात अडकला. रवींद्र जडेजाने त्याला ४८ धावांवर बाद केले. रहाणेचं अर्धशतक अवघ्या २ धावांनी हुकले असले तरी या खेळीसह त्याने मोठा पल्ला पार केला आहे. या सामन्यात ३१ धावा करताच अजिंक्य रहाणेनं आयपीएलमध्ये ५००० धावांचा पल्ला गाठला. IPL मध्ये अशी कामगिरी करणारा तो ९ वा फलंदाज ठरलाय. आयपीएलमध्ये ५००० धावांचा पल्ला गाठणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ७ भारतीयांसह दोन विदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वेगवेगळ्या ६ फ्रँचायझीकडून उतरलाय मैदानात
रहाणे हा २००८ पासून आयपीएलमध्ये खेळताना दिसतोय. चेन्नई विरुद्धच्या सामन्याआधी ६ वेगवेगळ्या फ्रँचायझीकडून खेळताना अजिंक्य रहाणेच्या खात्यात १९६ सामन्यात ३०.४८ च्या सरासरीसह १२४.७२ च्या स्ट्राइक रेटनं एकूण ४९६९ धावा केल्या होत्या. चेन्नई विरुद्ध ३१ धावा करताच त्याने ५००० धावांचा टप्पा गाठला.
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
रैनाच्या नावे आहे आयपीएलमध्ये सर्वात आधी ५००० धावा करण्याचा रेकॉर्ड
सुरेश रैना हा आयपीएलच्या इतिहासात ५ हजार धावांचा पल्ला गाठणारा पहिला खेळाडू आहे. २०१९ च्या हंगामात सुरेश रैना याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी केली होती. याशिवाय यादीत विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासह शिखर धवनचाही समावेश आहे. या खास यादीत आता अजिंक्य रहाणेची एन्ट्री झाली आहे.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
- विराट कोहली - ८५०९ धावा (२५५ डाव)
- रोहित शर्मा - ६९२८ धावा (२६३ डाव)
- शिखर धवन - ६७६९ धावा (२२१ डाव)
- डेविड वॉर्नर - ६५६५ धावा (१८४ डाव)
- सुरेश रैना - ५५२८ धावा (२०० डाव)
- एमएस धोनी - ५४०६ धावा (२४० डाव)
- एबी डिव्हिलियर्स - ५१६२ धावा (१७० डाव)
- केएल राहुल - ५०६४ धावा (१३३ डाव)
- अजिंक्य रहाणे - ५००४ धावा (१८२ डाव)
Web Title: IPL 2025 Kolkata Knight Riders Captain Ajinkya Rahane Becomes 9th Batter To Score 5000 Runs In IPL See Record With Full list
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.