पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात

विक्रमी विजयासह चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने कोलकाता नाईट रायडर्सच्या प्लेऑफ्सच्या आशा धूसर केल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 23:42 IST2025-05-07T23:42:11+5:302025-05-07T23:42:46+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 KKR vs CSK Dewald Brevis Urvil Patel and Shivam Dube helped Chennai Super Kings dampen Kolkata Knight Riders Playoff Hopes With A Successful 180 Run Chase | पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात

पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 KKR vs CSK  : पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या उर्विल पटेलची धमाकेदार इनिंग, डेवॉल्ड ब्रेविसचं धडाकेबाज अर्धशतक आणि शिवम दुबेच्या संयमी खेळीनंतर अखेरच्या षटकात धोनीन मारलेला षटकार याच्या जोरावर चेन्नईच्या संघाने ईडन गार्डन्सचं मैदान मारले. चेन्नई सुपर किंग्जचा संघ प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आधीच आउट झाला आहे. पण या विक्रमी विजयासह चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने कोलकाता नाईट रायडर्सच्या प्लेऑफ्सच्या आशा धूसर केल्या आहेत.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

CSK चा विक्रमी विजय
 

कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ बाद १७९ धावा करत चेन्नईसमोर १८० धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जचा अर्धा संघ  पॉवरप्लेमध्येच तंबूत परतला होता. या परिस्थितीतून चेन्नई सुपर किंग्जनं हा सामना जिंकून दाखवला. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या संघाने पॉवर प्लेमध्ये ५ विकेट्स गमावल्यावर १८० धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. हा एक विक्रमच आहे.

अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री

कोलकातानं सेट केलं होतं १८० धावांचे टार्गेट

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाकडून एकालाही अर्धशतक झळकावता आले नाही. अजिंक्य रहाणेनं संघाकडून सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय मनिष पांडेनं २८ चेंडूत केलेल्या नाबाद ३६ धावांच्या खेळीशिवाय आंद्रे रसेलनं केलेल्या ३८ धावांच्या जोरावर कोलकाताच्या संघाने निर्धारित २० षटकात ६ बाद १७९ धावा केल्या होत्या. 

CSK नं पॉवर प्लेमध्ये गमावल्या होत्या ५ विकेट्स, पण...

या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात खराब झाली. पॉवरप्लेमध्ये ६० धावांवर CSK चा अर्धा संघ तंबूत परतला होता. पण कोलकाता संघाला ही पकड मजबूत करता आली नाही. उर्विल पटेल याने ११ चेंडूत केलेल्या ३१ धावांच्या स्फोटक खेळीनंतर  डेवॉल्ड ब्रेविसची बॅट तळपली. त्याने २५ चेंडूत ५२ धावांची खेळी करत सामना CSK च्या बाजूनं सेट केला. शिवम दुबेनं संयमी खेळी करत डाव पुढे नेला. अखेरच्या षटकात धोनीने षटका मारून सामना चेन्नईच्या बाजून फिरवला. 

KKR चं प्लेऑफ्सचं गणित झालं मुश्किल

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात स्वबळावर प्लेऑफ्स गाठण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाला चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध विजय मिळवणे गरजेचे होते. पण हा सामना गमावल्यामुळे या शर्यतीत टिकून राहण्यासाठी त्यांच्यासमोरील आव्हान कठीण झाले आहे. उर्वरित २ सामने जिंकून ते १५ गुणांपर्यंत पोहचू शकतात. ते साध्य करूनही त्यांना अन्य संघाच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल. हे गणित जुळून येणं मुश्किलच वाटते. 

 

Web Title: IPL 2025 KKR vs CSK Dewald Brevis Urvil Patel and Shivam Dube helped Chennai Super Kings dampen Kolkata Knight Riders Playoff Hopes With A Successful 180 Run Chase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.