Harsha Bhogle clarification, IPL 2025 KKR vs GT: कर्णधार शुबमन गिलची धडाकेबाज ९० धावांची खेळी आणि त्यानंतर गोलंदाजाचा भेदक मारा याच्या बळावर गुजरात टायटन्स संघाने इडन गार्डन्सवर कोलकाता नाइट रायडर्स संघावर ३९ धावांची विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना गिलसह साई सुदर्शनच्या अर्धशतकामुळे गुजरातने १९८ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात कर्णधार अजिंक्य रहाणेचे अर्धशतकासह कोलकाताला केवळ १५९ धावांपर्यंतच मजल मारता आली. या सामन्यात अनेक मनोरंजक बाबी घडल्या. पण सध्या मैदानाबाहेरील एक गोष्टीची चर्चा सुरु आहे. सुप्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांच्याशी संबंधित ही चर्चा आहे.
नक्की काय आहे प्रकरण?
गुजरात आणि कोलकाता यांच्यातील सामना बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या इडन गार्डन्स मैदानावर होता. या सामन्यासाठी हर्षा भोगले समालोचक म्हणून पॅनेलवर उपस्थित नव्हते. त्यावरून चर्चा सुरु झाली. काही प्रसारमाध्यमांनी केलेल्या दाव्यांनुसार, CAB ने बीसीसीआयला एक पत्र दिले होते. संघटनेचे सचिव नरेश ओझा यांच्या वतीने सुमारे १० दिवसांपूर्वी हे पत्र देण्यात आले होते. त्या पत्रात बीसीसीआयला विनंती करण्यात आली होती की हर्षा भोगले आणि सायमन डूल या दोघांना समालोचन पॅनेलवरून काढून टाकावे. कोलकाच्या ईडन गार्डन्सची खेळपट्टी KKR संघाला फायदेशीर ठरत नसल्याची टीका या दोघांनी केली होती. त्यामुळे ही मागणी करण्यात आली होती.
हर्षा भोगले यांनी दिलं स्पष्टीकरण
कोलकाता मध्ये झालेल्या कालच्या सामन्यात मी समालोचनासाठी का नव्हतो, याबाबत काही चुकीच्या गोष्टी परसवल्या जात आहेत. एका साधं गणित आहे, मला त्या सामन्याच्या दिवशी ड्युटी लावण्यात आलेली नव्हती म्हणून मी तिथे नव्हतो. ज्या लोकांना प्रश्न पडले होते, त्यांनी मला विचारलं असतं तर त्यांनी मी सांगितलं असतं, इतका गोंधळ झाला नसता. IPL सुरु होण्याआधीच कोणता समालोचक कोणत्या सामन्यासाठी हजर राहणार हे ठरलेलं असतं. कोलकातामधील दोन सामन्यांसाठी मला ड्युटी लावण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या सामन्याला मी होतो, पण माझ्या कुटुंबातील मेडिकल इर्मजन्सीमुळे मी दुसऱ्या सामन्यासाठी हजर राहू शकलो नाही, असे हर्षा भोगले यांनी स्पष्टपणे सांगितले.
Web Title: IPL 2025 Harsha Bhogle clarification on Eden Gardens Pitch Controversy with CAB after KKR vs GT
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.