IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळे विराटचे लाड?

किंग कोहलीच्या या विराट कामगिरीशिवाय आणखी एक गोष्ट चर्चेत आली ती म्हणजे मॅच जिंकल्यावर त्याने केलेले सेलिब्रेशन.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 19:16 IST2025-04-21T19:05:02+5:302025-04-21T19:16:40+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 Double Standards BCCI Should Ban Him Fans Experts Slam Virat Kohli For Animated Celebration Vs PBKS Front Of Shreyas Iyer | IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळे विराटचे लाड?

IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळे विराटचे लाड?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्यात विराट कोहलीच्या भात्यातून कडक खेळी पाहायला मिळाली. ५४ चेंडूतील नाबात ७३ धावांच्या खेळीसह त्याने RCB च्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. एवढेच नाही तर आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक फिफ्टी प्लस धावसंख्या करण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावे केला. आतापर्यंत ८ शतकासह त्याने ६७ वेळा ही कामगिरी करून दाखवली आहे. याआधी हा विक्रम डेविड वॉर्नरच्या नावे होते. त्याने ४ शतकासह  ६६ वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केल्याचा रेकॉर्ड आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

कोहलीच्या सेलिब्रेशननंतर BCCI चा दुटप्पीपणा चव्हाट्यावर

किंग कोहलीच्या या विराट कामगिरीशिवाय आणखी एक गोष्ट चर्चेत आली ती म्हणजे मॅच जिंकल्यावर त्याने केलेले सेलिब्रेशन. विराट कोहली हा नेहमीच आक्रमक सेलिब्रेशन करताना दिसते. पण यावेळीचे त्याचे सेलिब्रेशनमुळे पुन्हा एकदा बीसीसीआयची दुटप्पी भूमिका चव्हाट्यावर आली आहे.   

विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ

तो मैदानात ऊर्जा दाखवतो अन् बाकीचे आचारसंहितेचे उल्लंघन करतात

विराट कोहलीनं पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरसमोर ज्या पद्धतीने सेलिब्रेशन केले ते अनेकांना खटकणारे ठरले. सोशल मीडियावर त्यासंदर्भात प्रतिक्रियाही उमटल्याचे पाहायला मिळाले. विराट कोहलीनं आक्रमक अंदाज सेलिब्रेशन केले की, तो काय कमालीची ऊर्जा दाखवतो म्हणायचं अन् अन्य खेळाडूनं असा तोरा दाखवला की, आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत त्याच्यावर कारवाई करायची, अशी दुटप्पी भूमिका बीसीसीआय घेते, अशा आशयाच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटताना दिसते.

या बिचाऱ्याला जमिनीवर आणलं, पण विराट मात्र हवेतच

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात लखनौ सुपर जाएंट्सच्या ताफ्यातून खेळणारा दिग्वेश सिंग राठी आपल्या सेलिब्रेशनमुळे चर्चेत आहे. विकेट घेतल्यावर तो नोटबुक स्टाइल सेलिब्रेशन करताना पाहायला मिळाले. प्रियांश आर्यची विकेट घेतल्यावर त्याने त्याच्यासमोर नोटबूक स्टाईल सेलिब्रेशन केल्यावर बीसीसीआयने त्याला फटकारल्याचे पाहायला मिळाले.य पुन्हा तोच तोरा दाखवल्यावर त्याच्यावर कारवाईही झाली. मग हा बिचारा आता जमिनीवर अर्थात ग्राउंडला नोटबुक करून विकेटचे सेलिब्रेशन साजरे करताना दिसतोय. कारवाई होऊ नये, यासाठी त्याने हा पर्याय निवडलाय. अर्थात बीसीसीआयने या नवख्या खेळाडूला जमिनीवर आणलं. 

विराटवर कारवाई का नाही?

पण विराटसंदर्भात मात्र बीसीसीआयची वेगळीच भूमिका दिसते. सरळ सरळ तो श्रेयस अय्यरला डिवचताना दिसले. पंजाबच्या कॅप्टनलाही ती गोष्ट खटकली. आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन करणाऱ्या विराट कोहलीवर कारवाई का होत नाही, असा प्रश्नही सोशल मीडियावर उपस्थितीत करण्यात येत आहे. पण बीसीसीआयने 'स्टार कल्चर'मुळे विराट आमच्या लाडाचा  अशीच काहीशी भूमिका घेतल्याचे दिसते.  दिग्वेश राठी शिवाय कोलकाताच्या ताफ्यातील हर्षित राणाही फ्लाइंग किस सेलिब्रेशनमुळे गोत्यात आल्याचे पाहायला मिळाले होते. 

Web Title: IPL 2025 Double Standards BCCI Should Ban Him Fans Experts Slam Virat Kohli For Animated Celebration Vs PBKS Front Of Shreyas Iyer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.