IPL 2025 CSK vs SRH : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सनरायझर्स हैदराबादच्या संघानेही चेन्नई सुपर किंग्जच्या बालेकिल्ल्यात विजयी पताका फडकावलीये. आयपीएलच्या पहिल्यांदाच त्यांनी चेपॉकच्या मैदानात चेन्नईला पराभूत केले आहे. १७ वर्षांनी चेपॉकच्या मैदानात पाहायला मिळालेला 'सूर्योदय' प्लेऑफ्सच्या दृष्टीने SRH संघासाठी आशेचा 'किरण'च आहे. उर्वरित पाच सामने जिंकून ते अजूनही आघाडीच्या चारमध्ये पोहचू शकतात. दुसरीकडे या पराभवासह चेन्नई सुपर किंग्जचा प्रवास आणखी खडतर झालाय. ते फक्त जर तरच्या समीकरणावर स्पर्धेत टिकून आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
चेन्नई सुपर किंग्जचा बॅटिंगमध्ये पुन्हा फ्लॉप शो; बऱ्याच वर्षांनी ओढावली ऑल आउटची नामुष्की
आयुष म्हात्रे ३० (१९), रवींद्र जडेजा २१ (१७), डेवॉन ब्रेविस ४२ (२५), शिवम दुबे १२ (९) आणि दीपक हुड्डा २२ (२१) यांनी दुहेरी आकडा गाठला. पण एकालाही चांगल्या खेळीचे रुपांतर मोठ्या खेळीत करता आले नाही. परिणामी चेन्नईचा संघ निर्धारित २० षटकेही खेळू शकला नाही. २०१९ च्या हंगामानंतर पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्जवर घरच्या मैदानात ऑल आउट होण्याची नामुष्की ओढावली. चेन्नईचा संघ १९.५ षटकात १५४ धावांवर आटोपला होता. हैदराबादकडून हर्षल पटेलनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय कमिन्स आणि उनादकड यांनी प्रत्येकी २-२ तर मोहम्मद शमी आणि कामिंदू मेंडिस याने १-१ विकेट्स घेतली.
IPL 2025 : रिक्स नको रे बाबा! जड्डू फसल्यावर MS धोनीनं काढला 'हातोडा' (VIDEO)
SRH साठी स्वबळावर प्लेऑफ्सचा मार्ग अजूनही खुला
चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा खातेही न उघडता तंबूत परतला. इशान किशन याने ३४ चेंडूत ४४ धावांची खेळी केली. ट्रॅविस हेड १९ (१६), हेनरिच क्लासेन ७(८) अनिकेत १९ (१९) धावा करून तंबूत परतल्यावर कामिंदू मेंडिस याने २२ चेंडूत केलेल्या नाबाद ३२ धावा आणि त्याला नितीश रेड्डीनं १३ चेंडूत १९ धावा करत दिलेली साथ या जोरावर सनरायझर्स हैदराबादच्या संघाने 'करो वा मरो' च्या प्रवासातील पहिली मॅच जिंकली आहे. स्पर्धेत टिकून राहण्याच्या त्यांच्या आशा पुन्हा एकदा पलव्वित झाल्या असून उर्वरित ५ पैकी ५ सामने जिंकत ते स्वबळाच्या जोरावर प्लेऑफ्स गाठू शकतात.
CSK वर पहिल्यांदाच ओढावली ही नामुष्की
सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या पराभवासह चेन्नई सुपर किंग्जच्या संघानं यंदाच्या हंगामात घरच्या मैदानावर चौथा सामना गमावला आहे. याआधी दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्सनं CSK च्या बोलेकिल्ल्यात सुरुंग लावत ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती. त्यात आता सनरायझर्स हैदराबादच्या संघाने आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईचं मैदान मारून दाखवलं आहे.
Web Title: IPL 2025 CSK vs SRH Harshal Patel 4 Wickets Hall Mendis And Ishan Kishan Knocks Take Sunrisers Hyderabad First Time Win Against Super Kings At MA Chidambaram Stadium Chennai
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.