चाहते सोडा! CSK ची बॅटिंग बघून चीअर लीडर्सचाही पडला चेहरा; घरच्या मैदानात लाजिरवाणी कामगिरी

आयपीएलच्या इतिहासातील चेन्नईच्या संघाने केलेली ही तिसऱ्या क्रमांकाची निच्चांकी धावसंख्या ठरली.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 22:04 IST2025-04-11T21:50:06+5:302025-04-11T22:04:32+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 CSK vs KKR MS Lowest Ever Total For Chennai Super Kings At home In MS Dhoni Returns As Captain 2nd In IPL History | चाहते सोडा! CSK ची बॅटिंग बघून चीअर लीडर्सचाही पडला चेहरा; घरच्या मैदानात लाजिरवाणी कामगिरी

चाहते सोडा! CSK ची बॅटिंग बघून चीअर लीडर्सचाही पडला चेहरा; घरच्या मैदानात लाजिरवाणी कामगिरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Chennai Super Kings Innings Lowest Totals Record : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जचा संघ महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरला. पण कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात एकाही फलंदाजीला आपला रुबाब दाखवता आला नाही. परिणामी यंदाच्या हंगामातील सर्वात कमी धावसंख्या करण्याचा नकोसा रेकॉर्ड त्यांच्या नावे झाला. निर्धारित २० षटकात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने ९ विकेट्सच्या मोबदल्यात १०३ धावा केल्या. चेन्नईच्या चेपॉकच्या मैदानातील चेन्नई सुपर किंग्जची ही सर्वात निच्चांकी धावसंख्या आहे. एवढेच नाहीतर आयपीएलच्या इतिहासातील चेन्नईच्या संघाने केलेली ही दुसऱ्या क्रमांकाची निच्चांकी धावसंख्या ठरली.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

 चाहते सोडा CSK ची बॅटिंग बघून चीअर लीडर्सचा चेहराही पडला

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरच्या गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत कमालीची गोलंदाजी करत चेन्नईला धक्क्यावर धक्के दिले. डेवॉन कॉन्वे ११ (१२), राहुल त्रिपाठी १६ (२२), विजय शंकर २९ (२१) आणि शिवम दुबेच्या नाबाद ३१ धावांशिवाय अन्य एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. चेन्नईच्या डावात विजय शंकरच्या भात्यातून एकमेव षटकार आला. याशिाय फक्त ८ चौकार पाहायला मिळाले. चेन्नई सुपर किंग्जची बॅटिंग बघून चाहते सोडा पण चीअर लीडर्सचा चेहराही पडल्यााचा सीन पाहायला मिळाला. सोशल मीडियावर CSK ला चीअर लीडर्सचा पडलेला चेहरा दाखवणारे काही फोटोही व्हायरल होताना दिसत आहे.

 IPL 2025 ...अन् आता रंगलीये ऋतुराजने कॅप्टन कूल धोनीला अनफॉलो केल्याची चर्चा

आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचा निच्चांकी धावसंख्येचा रेकॉर्ड

  • ९७ धावा विरुद्ध मुंबई इंडियन्स, वानखेडे, २०२२
  • १०३/९ विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई, २०२५*
  • १०९ विरुद्ध राजस्थान, जयपूर, २००८
  • ११०/८ विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दिल्ली, २०१२ 


 

Web Title: IPL 2025 CSK vs KKR MS Lowest Ever Total For Chennai Super Kings At home In MS Dhoni Returns As Captain 2nd In IPL History

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.