IPL 2025 Closing Ceremony Operation Sindoor : आयपीएल २०२५ च्या फायनल लढतीला सुरुवात होण्याआधी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 'ऑपरेशन सिंदूर' थीमसह क्लोजिंग सेरेमनीचा खास कार्यक्रम पार पडला. भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी खास परफॉमन्स सादर करण्यात आले. लोकप्रिय गायक शंकर महादेवन यांच्यासह शिवम आणि सिद्धार्थ महादेवन यांनी खास अन् आगळ्या वेगळ्या ढंगात कार्यक्रमात रंग भरला.
शंकर महादेवन आणि अन्य कलाकारांचे सादरिकरण
आयपीएल सांगता सोहळ्याच्या या खास कार्यक्रमाला सुरुवात होण्याआधी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर ‘तलवारों पर सिर वार दिया’ या गाण्याच्या सादरीकरणासह कार्यक्रमाला सुरुवात झाली. शंकर महादेवन आणि अन्य कलाकारांनी ‘ऐ वतन-वतन मेरे आबाद रहे तू’ यासह अन्य देशभक्तीपर गीतासह एक खास माहोल तयार केला.
IPL 2025 Final : RCB चाहत्यांची 'विराट' लाट! अहमदाबादच्या स्टेडियम बाहेर उसळला 'लाल समुद्र'
देशभक्तीपर गीतांसह दिसला खास माहोल
‘कदमों से मिलते हैं कदम’, ‘मां तुझे सलाम’ ‘यह देश है वीर जवानों’ का.. ‘लहरा दो ’ गाण्यांसह आयपीएल फायनल आधी सामन्याचा आनंद घेण्यासाठी मैदानात आलेले चाहते देशभक्तीच्या वातावरणा बुडून गेल्याचे पाहायला मिळाले.
नृत्य आणि देशभक्तीपर गाण्यांशिवाय हवाई दलाच्या चित्तथरारक कसरतीचा खास नजराही डोळ्याचे पारणे फेडणारा होता.
Web Title: IPL 2025 Closing Ceremony Operation Sindoor Shankar Mahadevan And Sons Salutes Indian Armed Forces Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.