ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच

Virat Kohli Records: हैदराबादविरुद्धच्या सामन्यात आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने नव्या विक्रमाला गवसणी घातली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 00:09 IST2025-05-24T00:04:10+5:302025-05-24T00:09:04+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025: Another Milestone for Virat Kohli, 800 Fours for RCB | ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच

ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

हैदराबादविरुद्धच्या सामन्यात आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने नव्या विक्रमाला गवसणी घातली. टी-२० क्रिकेटमध्ये एका संघासाठी सर्वाधिक चौकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. आरसीबीकडून खेळताना विराट कोहलीने ८०० चौकार मारले आहेत.

हैदराबादविरूद्धच्या सामन्यात विराट कोहलीने २५ चेंडूत ४३ धावांची खेळी केली, ज्यात एक षटकार आणि ७ चौकारांचा समावेश होता. या कामगिरीसह विराट कोहलीने आरसीबीसाठी टी-२० क्रिकेटमध्ये ८०० चौकार पूर्ण केले. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात एकाच संघासाठी ८०० चौकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरला. 

'अशी' कामगिरी करणार पहिलाच
विराट कोहलीनंतर जेम्स विन्सने हॅम्पशायरकडून टी-२० क्रिकेटमध्ये ६९४ चौकार मारले आहेत. नॉटिंगहॅम संघासाठी अ‍ॅलेक्स हेल्सने ५६३ चौकार मारले आहेत. भारताच्या रोहित शर्माने मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना टी-२० क्रिकेटमध्ये ५५० चौकार मारले आहेत.

आयपीएलमध्ये ८ हजारांहून अधिक धावा
विराट कोहली २००८ पासून आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळत आहे. आतापर्यंत त्याने २६४ आयपीएल सामन्यांमध्ये एकूण ८ हजार ५५२ धावा केल्या आहेत, ज्यात ८ शतके आणि ६२ अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय, तो आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाजही आहे

विराट कोहलीचा दमदार प्रदर्शन
विराट कोहलीने यंदाच्या हंगामात आतापर्यंत ५४८ धावा केल्या आहेत. धावांचा पाठलाग करताना, त्याने एक वेगळाच दर्जा दाखवला आहे. त्याने धावांचा पाठलाग करताना ५९, ६२, ७३, ५१ आणि ४३ धावा केल्या आहेत.

Web Title: IPL 2025: Another Milestone for Virat Kohli, 800 Fours for RCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.