५४९ धावांची त्सुनामी! सनरायझर्स हैदराबादची DK कडून धुलाई, तरीही RCB जिंकली नाही

आयपीएल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने धापा टाकल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 11:10 PM2024-04-15T23:10:08+5:302024-04-15T23:13:03+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Marathi Live : 549- Highest Match Aggregate in T20s,DINESH KARTHIK score 83 runs from just 35 balls, but SRH beat RCB by 25 runs  | ५४९ धावांची त्सुनामी! सनरायझर्स हैदराबादची DK कडून धुलाई, तरीही RCB जिंकली नाही

५४९ धावांची त्सुनामी! सनरायझर्स हैदराबादची DK कडून धुलाई, तरीही RCB जिंकली नाही

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Marathi Live : आयपीएल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने धापा टाकल्या. सनरायझर्स हैदराबादच्या २८७ धावांच्या प्रत्युत्तरात RCB ची सुरुवात दणक्यात झाली होती. पण, पुन्हा एकदा विराट कोहलीची विकेट पडली अन् गाडी गडगडली. SRH चा कर्णधार पॅट कमिन्स याचे कौतुक करायला हवे, त्याने अनुभव कामी आणत ३ महत्त्वाच्या विकेट्स घेऊन सामना फिरवला. Dinesh Karthik ने मैदान गाजवताना RCB साठी अखेरपर्यंत संघर्ष केला, परंतु ऐतिहासिक विजयाला तो मुकला.

४२ धावांत ५ विकेट्स! फॅफ ड्यू प्लेसिसची विकेट मिळताच काव्या मारन गोड नाचली, Video      


विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिसने RCB ला अपेक्षित सुरुवात करून दिली. या दोघांनी ६.२ षटकांत ८० धावा फलकावर चढवल्या. मयांक मार्कंडेने RCB ला मोठा धक्का दिला. विराट २० चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ४२ धावांवर त्रिफळाचीत झाला. विल जॅक्स ( ७) रन आऊट झाला, तर मार्कंडेने त्याची डावातील दुसरी विकेट घेताना रजत पाटीदारला ( ९) बाद केले. फॅफ ड्यू प्लेसिस हाच एक अडथळा उभा होता आणि १०व्या षटकात पॅट कमिन्सने तोही दूर केला.  फॅफ २८ चेंडूंत ७ चौकार व ४ षटकारांसह ६२ धावांवर झेलबाद झाला. कमिन्सने त्याच षटकात सौरव चौहानला बाद करून RCB ची अवस्था बिनबाद ८० वरून ५ बाद १२२ अशी केली.  


महिपाल लोम्रोर व दिनेश कार्तिक यांनी २५ चेंडूंत ५९ धावांची भागीदारी करून RCB च्या आशा जीवंत ठेवल्या होत्या. पण, वर्ल्ड कप विजेत्या कमिन्सने पुन्ह डोकं लावलं अन् ही भागीदारी तोडली. थोडा संथ पण आखूड चेंडूवर त्याने महिपालचा ( १९) त्रिफळा उडवला. कार्तिक झुंज जेत होता आणि संघाला १८ चेंडूंत ७२ धावा करून देण्याचे अशक्यप्राय आव्हान त्याने स्वीकारले होते. पण, भुवनेश्वर कुमारने १८वे षटक सुरेख फेकले अन् १४ धावाच दिल्या. १२ चेंडूंत ५८ धावा RCB ला हव्या होत्या. १९व्या षटकात कार्तिकच्या दमदार खेळीला टी नटराजनने ब्रेक लावला. कार्तिकने ३४ चेंडूंत ५ चौकार व ७ षटकारांसह ८३ धावांची वादळी खेळी केली.  RCB ने ७ बाद २६२ धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात ५४९ धावा झाल्या आणि ट्वेंटी-२०तील या सर्वोत्तम ठरल्या. 

तत्पूर्वी, ट्रॅव्हिस हेड व अभिषेक शर्मा ( ३४) यांनी ७.१ षटकांत शतक झळकावले. हेड थांबणारा नव्हता आणि त्याने  ४१ चेंडूंत ९ चौकार व ८ षटकारांसह १०२ धावा चोपल्या. त्याची व हेनरिच क्लासेनची ५७ ( २६ चेंडू) धावांची भागीदारी दमदार राहिली.  क्लासेनने ३१ चेंडूंत २ चौकार व ७ षटकारांसह ६७ धावा चोपल्या.  एडन मार्कराम व अब्दुल समद यांनी १९ चेंडूंत ५६ धावा जोडल्या व संघाला ३ बाद २८७ धावांपर्यंत पोहोचवले. आयपीएल इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.  समद १० चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ३७ धावांवर, तर मार्करम १७ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ३२ धावांवर नाबाद राहिला. 
 

Web Title: IPL 2024, Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Marathi Live : 549- Highest Match Aggregate in T20s,DINESH KARTHIK score 83 runs from just 35 balls, but SRH beat RCB by 25 runs 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.