SRH vs PBKS Live : २० वर्षीय पोराने PBKS ला झोडले, अर्शदीप सिंगने SRH ला पुन्हा बॅकफूटवर फेकले 

PBKS ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्याच चेंडूवर त्यांच्याकडून मोठी चूक झालेली...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 09:12 PM2024-04-09T21:12:47+5:302024-04-09T21:16:07+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Live Marathi : 20-year-old, Nitish Kumar Reddy score 64 runs, Arshdeep Singh took 4 wickets, SRH set 183 runs target to PBKS | SRH vs PBKS Live : २० वर्षीय पोराने PBKS ला झोडले, अर्शदीप सिंगने SRH ला पुन्हा बॅकफूटवर फेकले 

SRH vs PBKS Live : २० वर्षीय पोराने PBKS ला झोडले, अर्शदीप सिंगने SRH ला पुन्हा बॅकफूटवर फेकले 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Live Marathi : पंजाब किंग्सच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली खरी, परंतु सनरायझर्स हैदराबादच्या २०वर्षीय नितीश कुमार रेड्डीने ( Nitish Kumar Reddy ) तुफान फटकेबाजी केली. SRH च्या ताफ्यातील मोठे खेळाडू फेल गेल्यानंतर PBKS आश्वस्त होते, परंतु २० वर्षाच्या पोराने त्यांना झोडून काढले. त्याच्या अर्धशतकाच्या जोरावर हैदराबादने सामन्यात पुनरागमन केले आणि पंजाबसमोर तगडे आव्हान उभे केले. पंजाबसाठी अर्शदीप सिंगने ( ४-२९) चांगली गोलंदाजी केली. 


PBKS ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कागिसो रबाडाने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर ट्रॅव्हिस हेडसाठी झेलबादची जोरदार अपील झाले. जितेश शर्मा व कर्णधार शिखर धवन यांनी अपील केले. पण, DRS न घेतल्याने हेडला जीवदान मिळाले. त्यानंतर हेडने रबाडाच्या पुढच्या षटकात सलग ३ चौकार खेचले. अर्शदीप सिंगच्या पहिल्याच षटकात पंजाब किंग्सला मोठी विकेट मिळवली. हेडने ( २१) खेचलेला मोठा फटका उत्तुंग उडाला आणि मिड ऑफला उभा असलेल्या धवनने पळत चांगला झेल घेतला. अर्शदीपने एक चेंडूच्या अंतराने एडन मार्करमला ( ०) बाद करून हैदराबादला २७ धावांवर दोन धक्के दिले. अभिषेक शर्मा ( १६) चांगल्या टचमध्ये दिसला, परंतु सॅम कुरनने त्याला गंडवले आणि माघारी पाठवले.    


राहुल त्रिपाठी व नितीश कुमार रेड्डी यांनी आशेचा किरण दाखवला होता. पण, हर्षल पटेलने ही जोडी तोडली. राहुल ११ धावांवर झेलबाद झाला, यावेळी जितेश शर्माने DRS घेतला व तो यशस्वी ठरला.  हेनरिच क्लासेनही ( ९) आज फेल गेला आणि हर्षल पटेलने ही विकेट मिळवली. पण, नितीश खेळपट्टीवर उभा राहिला आणि त्याने ३२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ५५ धावांवर शशांक सिंगने त्याचा झेल टाकला. नितीश व अब्दुल समद यांची २० चेंडूंत ५०  धावांची भागीदारी अर्शदीपने तोडली. समद १२ चेंडूंत २५ धावांवर बाद झाला. पुन्हा एकदा एका चेंडूच्या अंतराने अर्शदीपने नितीशला बाद केले. नितीशने ३७ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने ६४ धावांवर बाद झाला.  

त्यानंतर पुन्हा हैदराबादने डोके वर काढले आणि रबाडाने पॅट कमिन्सला ( ३) माघारी पाठवले.  रबाडाने ४ षटकांत ३२ धावांत १ विकेट मिळवली. हैदराबादाला ९ बाद १८२ धावा करता आल्या. 

Web Title: IPL 2024 Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Live Marathi : 20-year-old, Nitish Kumar Reddy score 64 runs, Arshdeep Singh took 4 wickets, SRH set 183 runs target to PBKS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.