67/7! रिषभच्या चतुराईने गुजरात टायटन्सला रडवले; स्टम्पमागून 'गेम' केला, Video 

गुजरात टायटन्सवर घरच्या मैदानावर रडण्याची वेळ आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 08:43 PM2024-04-17T20:43:35+5:302024-04-17T20:43:52+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, Gujarat Titans vs Delhi Capitals Marathi Live : Gujarat Titans 66/7, Great work with the gloves behind the stumps from Rishabh Pant, Video  | 67/7! रिषभच्या चतुराईने गुजरात टायटन्सला रडवले; स्टम्पमागून 'गेम' केला, Video 

67/7! रिषभच्या चतुराईने गुजरात टायटन्सला रडवले; स्टम्पमागून 'गेम' केला, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, Gujarat Titans vs Delhi Capitals Marathi Live : गुजरात टायटन्सवर घरच्या मैदानावर रडण्याची वेळ आली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी त्यांचे ६ फलंदाज ४८ धावांवर माघारी पाठवले. पॉवर प्लेमध्ये त्यांनी चार विकेट्स गमावल्या होत्या आणि आयपीएलमधील घरच्या मैदानावरील गुजरातची पॉवर प्लेमधील निराशाजनक कामगिरी ठरली. २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्यांनी ३१ धावांत ३ फलंदाज गमावले होते. DC चा कर्णधार रिषभ पंत ( Rishabh Pant ) याने आज कमाल करून दाखवली. एक अफलातून झेल अन् चतुराईने केलेल्या दोन स्टम्पिंगने GT चे कंबरडे मोडले.

गुजरात टायटन्सची 'Power' गुल! सुमित कुमारचा भन्नाट रन आऊट, रिषभ पंतचा अफलातून झेल


रिषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि पॉवर प्लेमध्ये गोलंदाजांनी दम दाखवला. गुजरात टायटन्सचे चार फलंदाज ३० धावांत माघारी पाठवून DC ने सामन्यावर पकड घेतली. अनुभवी इशांत शर्माने दुसऱ्याच षटकात युवा फलंदाज शुबमन गिल ( ८) याला ट्रॅप करून बाद केले. त्यानंतर मुकेश कुमारने चौथ्या षटकात वृद्धीमान सहाचा ( २) त्रिफळा उडवला. एक धाव घेण्याच्या गडबडीत चांगली फलंदाजी करणाऱ्या साई सुदर्शनने ( १२) विकेट फेकली, सुमित कुमारने अचूक थ्रो करून GT च्या फलंदाजाला रन आऊट केले. शर्माने पाचव्या षटकात गुजरातचा मेन फलंदाज डेव्हिड मिलर ( २) याला माघारी पाठवले आणि यष्टींमागे रिषभ पंतने अप्रतिम झेल घेतला. पहिल्या पॉवर प्लेमध्ये गुजरताने ३० धावांत ४ विकेट्स गमावल्या. 


गुजरातवर दडपण वाढवण्यासाठी रिषभने गोलंदाजीला फिरकीपटू कुलदीप यादवला आणले. दुसऱ्या बाजूने त्रिस्तान स्तब्सच्या फिरकीचा माराही त्याने सुरू केला. स्तब्सच्या त्या षटकात अभिनव मनोहरला ( ८) रिषभ पंतने स्टम्पिंग केले. गुजरातचा निम्मा संघ ४७ धावांत तंबूत परतला. इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आलेल्या शाहरुख खानला ( ०) रिषभने चतुराईने माघारी पाठवले. स्तब्सच्या वाईड चेंडूवर रिषबने आधी झेलसाठी अपील केले अन् नंतर चेंडू यष्टींवर आदळून त्याने चपळ स्टम्पिंग केली. राहुल तेवाटियालाही ( १०) पायचीत करून गुजरातची अवस्था ७ बाद ६६ अशी दयनीय केली. 

Web Title: IPL 2024, Gujarat Titans vs Delhi Capitals Marathi Live : Gujarat Titans 66/7, Great work with the gloves behind the stumps from Rishabh Pant, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.