IPL 2022 Retention : रोहित, जडेजा, ऋषभ पंत झाले मालामाल! आरसीबीसाठी विराटनं 2 कोटींवर सोडलं पाणी

रोहितबरोबर जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि किरोन पोलार्ड यांना संघात कायम ठेवले बुमराहसाठी १२ कोटी रुपये मोजले.  सूर्यकुमारला आठ कोटी तर पोलार्डला सहा कोटी मोजले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 10:49 AM2021-12-01T10:49:39+5:302021-12-01T10:51:15+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 Retention Rohit, Jadeja, Rishabh Pant become rich and Virat released water for RCB at Rs 2 crore | IPL 2022 Retention : रोहित, जडेजा, ऋषभ पंत झाले मालामाल! आरसीबीसाठी विराटनं 2 कोटींवर सोडलं पाणी

IPL 2022 Retention : रोहित, जडेजा, ऋषभ पंत झाले मालामाल! आरसीबीसाठी विराटनं 2 कोटींवर सोडलं पाणी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext


नवी दिल्ली : आयपीएलच्या पुढच्या मोसमात नेमके कोणते खेळाडू ठेवायचे, हा निर्णय मंगळवारी सर्व संघांना घ्यायचा होता. प्रत्येक संघाला जास्तीत जास्त चारच खेळाडू रिटेन करता येऊ शकत होते, मुंबई इंडियन्सने चार खेळाडूंना रिटेन करत सर्वांनाच धक्का दिला. मुंबई संघाने यावेळी कर्णधार रोहित शर्माला १६ कोटी रुपये मोजत आपल्या संघात कायम ठेवले.

रोहितबरोबर जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि किरोन पोलार्ड यांना संघात कायम ठेवले बुमराहसाठी १२ कोटी रुपये मोजले.  सूर्यकुमारला आठ कोटी तर पोलार्डला सहा कोटी मोजले.  सीएसके संघात धोनीने आपल्यापेक्षा रवींद्र जडेजाला अधिक रक्कम द्या,अशी विनंती करीत मनाचा मोठेपणा सिद्ध केला. जडेजाला १६ कोटी मिळाले. राजस्थान रॉयल्सने मागच्या मोसमातील सर्वांत महागडा खेळाडू ख्रिस मॉरिस याला रिलिज केले. दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंत याला देखील १६ कोटी रुपयात कायम ठेवले आहे.

धोनीच्या मनाचा मोठेपणा -
धोनीने स्वत:चे मानधन कमी करून अव्वल खेळाडूचा मान रवींद्र जडेजाला दिला. त्यामुळे जडेजा १६ कोटींचा मानकरी ठरला. तर धोनीने १२ कोटींसह दुसऱ्या स्थानावर राहणे पसंत केले.

आरसीबीसाठी विराटने २ कोटींवर पाणी सोडले
विराट कोहलीला रॉयल चॅलेंजर बँगलोरने १५ कोटी रुपयांमध्ये संघात कायम राखल्याने त्याला २ कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागले आहे. बीसीसीआयच्या नियमानुसार फ्रँचायझींना  ४ खेळाडूंना संघात कायम राखण्यासाठी ४२ कोटींची रक्कम देण्यात आली होती. जर एखाद्या संघाने केवळ तीनच खेळाडूंना रिटेन केले तर त्यातील अव्वल खेळाडूला १५ कोटी मिळणार होते. त्यानुसार विराटला २ कोटींचा फटका बसला. मागच्या वर्षी आरसीबीने विराटला संघात कायम ठेवण्यासाठी १७ कोटींची रक्कम मोजली होती.

राहुल, राशिद अडचणीत, पंजाबची बीसीसीआयकडे तक्रार -
-    रिटेनशन मुदत संपण्याआधीच लोकेश राहुल आणि राशिद खान यांच्यासह लखनौ आणि अहमदाबादच्या दोन नवीन फ्रेंचायझीही 
अडचणीत आल्या आहेत. पंजाब किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबादने राहुल आणि राशिदबाबत  बीसीसीआयकडे तक्रार केली आहे. ‘नवीन फ्रेंचायझी राहुल आणि राशिद यांना त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना सामील करून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या योजनांवर परिणाम होत असल्याची तक्रार पंजाब आणि हैदराबाद संघाने केली. 

-    इनसाईड स्पोर्ट्सनुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने याची माहिती दिली. ‘आम्हाला कोणतेही पत्र मिळालेले नाही, परंतु लखनौ संघ खेळाडूंशी संपर्क करीत असल्याची तोंडी तक्रार मिळाली आहे. आम्ही त्याची चौकशी करीत असून त्यात तथ्य आढळल्यास योग्य ती कारवाई करू. संघांचा सध्याचा समतोल बिघडू नये. तीव्र स्पर्धेमध्ये हा प्रकार टाळला पाहिजे. सध्याच्या संघांनी खेळाडूंशी संपर्क साधणे योग्य नाही,’ असेही या अधिकाऱ्याने सांगितले. बीसीसीआयने तयार केलेल्या लिलावाच्या नियमानुसार, दोन्ही नवीन फ्रेंचायझींना लिलावापूर्वी त्यांच्या आवडीचे तीन खेळाडू खरेदी करण्याचा पर्याय आहे. परंतु हा पर्याय ‘ट्रेडिंग विंडो’ सुरू झाल्यानंतरच खुला होईल.

मुंबई इंडियन्स -
रिटेन खेळाडू     रक्कम

रोहित शर्मा  -  १६ कोटी
जसप्रीत बुमराह  -  १२ कोटी
सूर्यकुमार यादव  -  ८ कोटी
किरोन पोलार्ड  -  ६ कोटी
रिलिज खेळाडू : हार्दिक पांड्या,कृणाल पांड्या, डिकॉक
शिल्लक : ४८ कोटी

रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर -
विराट कोहली  -  १५ कोटी
ग्लेन मॅक्सवेल  -  ११ कोटी
मोहम्मद सिराज  -  ७ कोटी
रिलिज खेळाडू : हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, देवदत्त पडिक्कल
शिल्लक : ५७ कोटी

दिल्ली कॅपिटल्स -
ऋषभ पंत  -  १६ कोटी
पृथ्वी शॉ  -  ७.५ कोटी
अक्षर पटेल  -  ०९ कोटी
एन्रिच नॉर्खिया  -  ६.५ कोटी
शिल्लक : ४७.५ कोटी

राजस्थान रॉयल्स -
संजू सॅमसन  -  १४ कोटी
जोस बटलर  -  १० कोटी
यशस्वी जैस्वाल  -  ०४ कोटी
शिल्लक : ६२ कोटी

पंजाब किंग्स -
मयंक अग्रवाल  -  १४ कोटी
अर्शदीपसिंग  -  ०४ कोटी
शिल्लक: ७२ कोटी

चेन्नई सुपरकिंग्स -
रवींद्र जडेजा  -  १६ कोटी
एम.एस. धोनी  -  १२ कोटी
मोईन अली  -  ०८ कोटी
रुतुराज गायकवाड  -  ०६ कोटी
शिल्लक : ४८ कोटी

कोलकाता नाईट रायडर्स -
सुनील नरेन  -  ०६ कोटी
आंद्रे रसेल  -  १२ काेटी
वरुण चक्रवर्ती  -  ०८ काेटी
व्यंकटेश अय्यर  -  ०८ काेटी
शिल्लक : ४८ कोटी

सनरायझर्स हैदराबाद -
केन विलियम्सन  -  १४ कोटी
अब्दुल समद  -  ०४ कोटी
उमरान मलिक  -  ०४ कोटी
शिल्लक: ६८ कोटी

Web Title: IPL 2022 Retention Rohit, Jadeja, Rishabh Pant become rich and Virat released water for RCB at Rs 2 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.