Quinton de Kock KL Rahul  IPL 2022 LSG vs KKR Live Update : क्विंटन डी कॉक - लोकेश राहुल या जोडीने इतिहास रचला, संपूर्ण २० षटकं खेळून काढताना धावांचा एव्हरेस्ट उभारला 

क्विंटनने ५९ चेंडूंत आयपीएलमधील दुसरे शतक पूर्ण केले. त्यात ६ चौकार व ७ षटकारांचा समावेश होता. या दोघांनी २०० धावांची भागीदारी करताना इतिहास रचला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 09:13 PM2022-05-18T21:13:33+5:302022-05-18T21:14:01+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 LSG vs KKR Live Update : Quinton De Kock 140*(70) & KL Rahul 68*(51)scores the first ever 200 opening stand in IPL history, Lucknow - 210/0 from 20 overs | Quinton de Kock KL Rahul  IPL 2022 LSG vs KKR Live Update : क्विंटन डी कॉक - लोकेश राहुल या जोडीने इतिहास रचला, संपूर्ण २० षटकं खेळून काढताना धावांचा एव्हरेस्ट उभारला 

Quinton de Kock KL Rahul  IPL 2022 LSG vs KKR Live Update : क्विंटन डी कॉक - लोकेश राहुल या जोडीने इतिहास रचला, संपूर्ण २० षटकं खेळून काढताना धावांचा एव्हरेस्ट उभारला 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Live Update :    लोकेश राहुल  ( KL Rahul ) व क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) या जोडीने KKRच्या गोलंदाजांची धुलाई केली. प्ले ऑफसाठी महत्त्वाच्या लढतीत LSGच्या सलामीवीरांनी पूर्ण २० षटके खेळून काढताना विक्रमी कामगिरी केली. क्विंटनला १२ धावांवर जीवदान मिळाले होते आणि त्यानंतर तो जो सुटला तो सुटला. त्याने आयपीएलमधील आज दुसरे शतक झळकावताना KKRची वाट लावली. 


लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय. तिसऱ्या षटकात पदार्पणवीर अभिजित तोमरने १२ धावांवर खेळत असलेल्या क्विंटन डी कॉकचा झेल टाकला.  १०व्या षटकात टीम साऊदीला षटकार खेचून लोकेशने यंदाच्या पर्वातही ५०० धावांचा टप्पा ओलांडला. आयपीएलमध्ये सलग पाचव्या पर्वात त्याने हा पराक्रम केला. क्विंटननं ३६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ४९ वेळा ५०+ धावा करण्याचा विक्रम क्विंटनने नावावर केला. त्याने पाकिस्तानच्या कामरान अकमलचा ( ४८ ) विक्रम मोडला. त्यापाठोपाठ लोकेशनेही ४१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. 

आयपीएलच्या ९९ डावांत लोकेशने ३० अर्धशतकं व ४ शतकं झळकावली आहेत. या दोघांनी शतकी भागीदारी केली खरी, परंतु आयपीएल २०२२मधील पहिल्या विकेटसाठीची ही संथ शतकी भागीदारी ठरली. मात्र, KKRविरुद्धची ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. क्विंटनने ५९ चेंडूंत आयपीएलमधील दुसरे शतक पूर्ण केले. त्यात ६ चौकार व ७ षटकारांचा समावेश होता. या दोघांनी २०० धावांची भागीदारी करताना इतिहास रचला. आयपीएलच्या इतिहासातील ही सलामीवीरांची सर्वोत्तम भागीदारी ठरली. त्यांनी जॉनी बेअरस्टो व डेव्हिड वॉर्नर यांचा १८५ धावांचा विक्रम मोडला. History by Quinton De Kock and KL Rahul - the highest ever opening partnership in IPL history. संपूर्ण २० षटके खेळून त्यांनी विक्रमांची नोंद केली. क्विंटन ७० चेंडूंत १० चौकार व १० षटकारांसह १४० धावांवर,  तर लोकेश ५१ चेंडूत ६८ धावांवर नाबाद राहिला. लखनौने २१० धावा केल्या. 

Web Title: IPL 2022 LSG vs KKR Live Update : Quinton De Kock 140*(70) & KL Rahul 68*(51)scores the first ever 200 opening stand in IPL history, Lucknow - 210/0 from 20 overs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.