ipl 2021 You are not going to get the Orange Cap Virat Kohli to Riyan Parag | IPL 2021: 'तुला ऑरेंज कॅप मिळू शकत नाही', विराट कोहली राजस्थानच्या रियान परागला असं का म्हणाला?

IPL 2021: 'तुला ऑरेंज कॅप मिळू शकत नाही', विराट कोहली राजस्थानच्या रियान परागला असं का म्हणाला?

IPL 2021: राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचा अष्टपैलू रियान पराग यानं पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्धच्या पहिल्या सामन्यात ११ चेंडूत २५ धावांची खेळी साकारली. राजस्थाननं सामना गमावला असला तरी रियान परागनं पुन्हा एकदा सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. गोलंदाजीसोबत आपण चांगली फटकेबाजीही करू शकतो हे त्याच्या खेळीतून त्यानं पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवलं. 

युवा कर्णधारांची लढाई! आज ५ मातब्बर खेळाडू संघाबाहेर; कुणाचं पारडं जड?

पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यानंतर रियान परागनं त्याच्या फलंदाजीमागचं एक गुपित उघड केलं. विशेष म्हणजे त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (Royal Challengers Bangalore) कर्णधार विराट कोहलीसोबतची एक आठवण शेअर केली. गेल्या वर्षीच्या आयपीएल स्पर्धेत रियान परागचं विराट कोहलीसोबत संभाषण झालं होतं. यात कोहलीनं रियान परागला ऑरेंज कॅप मिळणार नाही त्याची काळजी करू नकोस, असं सांगितलं होतं. खुद्द रियान परागनं याबाबतचा खुलासा केला आहे. 

नेमकं काय म्हणाला होता कोहली?
विराट कोहलीनं रियान परागला एक महत्वाचा सल्ला दिला होता. तो रियान परागनं सांगितला आहे. "गेल्या आयपीएलमध्ये माझं विराटसोबत बोलणं झालं होतं. तुला ऑरेंज कॅप मिळणार नाहीय असं त्यानं मला जाणीवपूर्णक सांगितलं होतं. तू संघात पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरतोय त्यामुळे ऑरेंज कॅपचा विचार करण्यात काहीच उपयोग नाही. त्यामुळे तू ज्या स्थानावर फलंदाजीसाठी उतरतोय त्याजागी खेळताना संघाच्या विजयासाठी महत्वाच्या ठरणाऱ्या २० ते ३० धावा कशा काढून देऊ शकतोय याचा विचार कर. संघातील तुझं योगदान कसं वाढवू शकतोस याचा फक्त विचार कर असा सल्ला कोहलीनं दिला होता", असं रियान परागनं सांगितलं. 

विराटनं सांगितलेले शब्द माझ्या डोक्यात एकदम पक्के बसले आणि त्यानुसारच मी विचार करू लागलो. त्यामुळेच माझ्या धावा किती होतायत याकडे लक्ष न देता संघासाठी मी कसं जास्तीत जास्त योगदान देऊ शकतो याचा विचार करतो. माझा खेळ संघासाठी कसा उपयुक्त ठरेल याचा विचार करुनच मी खेळतोय, असं रियान परागनं सांगितलं. 

जेव्हा तुम्ही विराट कोहली आणि एमएस धोनी यांच्यासारख्या मातब्बर खेळाडूंविरोधात मैदानात उतरता तेव्हा तुम्ही आपोआप मानसिकरित्या सक्षम होत राहता, असंही तो पुढे म्हणाला. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ipl 2021 You are not going to get the Orange Cap Virat Kohli to Riyan Parag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.