IPL 2021: ...तर हैदराबादनं बाजी मारली असती; 'या' दिग्गजानं मनीष पांडेला पराभवासाठी धरलं जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 02:37 PM2021-04-12T14:37:56+5:302021-04-12T14:42:02+5:30

IPL 2021: 'मनीषने अखेरच्या काही षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी केली असती, तर हैदराबादचा पराभव झाला नसता...’

IPL 2021 Virender Sehwag reveals WHY Manish Pandey couldnt win the game for SRH | IPL 2021: ...तर हैदराबादनं बाजी मारली असती; 'या' दिग्गजानं मनीष पांडेला पराभवासाठी धरलं जबाबदार

IPL 2021: ...तर हैदराबादनं बाजी मारली असती; 'या' दिग्गजानं मनीष पांडेला पराभवासाठी धरलं जबाबदार

Next

मुंबई : कोलकाता नाईट रायडर्सने सोमवारी रात्री लढवय्या खेळ करत अटीतटीच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचे आव्हान १० धावांनी परतावले आणि यंदाच्या आयपीएलमध्ये विजयी सलामी दिली. कोलकाताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादची अडखळती सुरुवात झाली. मात्र, जॉनी बेयरस्टो आणि मनीष पांड्ये यांनी तडाखेबंद अर्धशतक झळकवात हैदराबादला विजया समीप आणले होते. मात्र, त्यानंतरही हाच मनीष पांड्ये हैदराबादच्या पराभवासाठी जबाबदार ठरत आहे. माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनेही हैदराबादच्या पराभवासाठी मनीषलाच जबाबदार धरले आहे.

आक्रमक सुरुवात केल्यानंतर मनीषने अखेरच्या क्षणी संथ फलंदाजी केल्याने हैदराबादचा पराभव झाल्याचे सेहवागने सांगितले. सेहवाग म्हणाला की, ‘जर का, मनीषने अखेरच्या काही षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी केली असती, तर हैदराबादचा पराभव झाला नसता.’ एका क्रिकेट संकेतस्थळावर झालेल्या प्रश्नोत्तरामध्ये सेहवागने आपले मत व्यक्त केले. एका युझरने सेहवागला प्रश्न केला की, ‘खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतरही मनीषने अखेरच्या ६ षटकांमध्ये केवळ एकच षटकार ठोकला. याचा किती मोठा फटका बसला?’  यावर सेहवागने म्हटले की, ‘मनीषने अखेरच्या २-३ षटकांमध्ये चेंडू सीमापार धाडला नाही. त्याने षटकार मारला तोही अखेरच्या चेंडूवर. तोपर्यंत सामना संपला होता. त्या निर्णायक क्षणी पुढे येऊन मनीषला फटकेबाजी करण्याची गरज होती. त्याने सर्व दडपण झुगारलेही होते. तो जर त्यावेळी मोकळेपणाने खेळला असता, कदाचित हैदराबादचा विजय झाला असता. कदाचित हैदराबादने एक-दोन चेंडू राखूनच बाजी मारली असती.’

सेहवागने पुढे म्हटले की, ‘अनेकदा असेही होते की, खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतरही आपल्याला मोठे फटके खेळण्याजोगे चेंडू मिळत नाही. मनीषसोबतही असेच झाले होते. कोलकाताच्या गोलंदाजांनी स्लोअर चेंडू आणि यॉर्करच्या जोरावर त्याला रोखण्यात यश मिळवले. त्यामुळेच त्याला आक्रमक फटके खेळता आले नाही.’ 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021 Virender Sehwag reveals WHY Manish Pandey couldnt win the game for SRH

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app