IPL 2021 Suspended : दोन आठवड्यांपूर्वीच सांगितलं होतं, लोकांचा जीव महत्त्वाचा; स्थगितीच्या निर्णयावर शोएब अख्तरची प्रतिक्रीया

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 03:04 PM2021-05-05T15:04:00+5:302021-05-05T15:24:27+5:30

KKRविरुद्ध विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं खेळण्यास नकार दिला अन् तो सामना पुढे ढकलावा लागला. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स व राजस्थान रॉयल्स यांच्यातली लढतही पुढे ढकलली.

IPL 2021 Suspended : Saw it coming, nothing more important than saving human lives: Shoaib Akhtar on IPL 2021 | IPL 2021 Suspended : दोन आठवड्यांपूर्वीच सांगितलं होतं, लोकांचा जीव महत्त्वाचा; स्थगितीच्या निर्णयावर शोएब अख्तरची प्रतिक्रीया

IPL 2021 Suspended : दोन आठवड्यांपूर्वीच सांगितलं होतं, लोकांचा जीव महत्त्वाचा; स्थगितीच्या निर्णयावर शोएब अख्तरची प्रतिक्रीया

Next

बीसीसीआयनं मंगळवारी इंडियन प्रीमिअर लीग अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला. कोलकातान नाईट रायडर्सचा वरूण चक्रवर्थी व संदीप वॉरियर्स यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. दोन दिवसानंतर सनरायझर्स हैदराबादचा यष्टिरक्षक-फलंदाज वृद्धीमान सहा व दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू अमित मिश्रा यांनाही कोरोची लागण झाल्याचे समोर आले. KKRविरुद्ध विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं खेळण्यास नकार दिला अन् तो सामना पुढे ढकलावा लागला. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स व राजस्थान रॉयल्स यांच्यातली लढतही पुढे ढकलली. या घडामोडीनंतर बीसीसीआयनं अखेर स्पर्धाच स्थगित करण्याचा निर्णय घेतला. KKRचा वरुण चक्रवर्थी हॉस्पिटलमध्ये गेला अन् DCच्या अमित मिश्रा कोरोना संकटात सापडला; जाणून घ्या नेमकं काय घडलं!

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर म्हणाला की,''आयपीएल रद्द झालीच. हे असंच होणार माहित होतं आणि मी दोन आठवड्यांपूर्वी हा सल्ला दिला होता. भारतात सध्या जी परिस्थिती आहे, त्याकाळात लोकांचा जीव वाचवण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे काहीच नाही.'' अहमदाबादमध्ये खेळाडूंची बस जाण्यासाठी अडवली रुग्णवाहिका; Video व्हायरल 

''२००८पासून तुम्ही पैसे कमावताय.. मग एक वर्ष स्पर्धा न खेळवून पैसे कमावले नाहीत, तर त्यांच्यावर कोणतं संकट कोसळणार होतं? ही नैसर्गीक आपत्ती आहे. शेजारी म्हणून मी विनंती करतो की आयपीएल रद्द व्हायला हवी,''असेही तो म्हणाला.
 

शोएब अख्तर आधी काय म्हणाला होता?
"भारत सध्या कोरोनाच्या भयानक संकटाला सामोरा जात आहे. कठोर नियमांचं पालन करणं जर जमत नसेल तर आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्याचा विचार करायला हवा. पाकिस्तानची प्रिमिअर लीग पुढे ढकलण्यात आलीय त्यामुळे मी आयपीएलही पुढे ढकला अशा अर्थानं बोलत नाहीय. पीएसएल स्पर्धा देखील जून महिन्यात घेऊ नये तीही आणखी पुढे ढकलावी", असं शोएब अख्तर म्हणाला होता.  फॅफ ड्यू प्लेसिस, सुरेश रैना यांच्यावरही कोरोना संकट?; CSKच्या गोटातून समोर आली धक्कादायक बाब!

ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी BCCI करणार चार्टर्ड फ्लाईटची सोय 
ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मायदेशात जाण्यापूर्वी मालदिवचा आसरा घेतील अशी चर्चा होती, परंतु आता त्या श्रीलंकेचा पर्यायही समोर आला आहे. हॉकली यांनी  हे दोन पर्याय समोर ठेवले आहेत. ते म्हणाले, सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ, अम्पायर्स, समालोचक यांना सुखरूप घरी आणण्यासाठी आम्ही सर्व तयारी करत आहोत. बीसीसीआय आणि आम्ही सोबत मिळून काम करत आहोत. बीसीसीआयकडून आम्हाला चांगलं सहकार्य मिळत आहे. येत्या दोन-तीन दिवसांत बीसीसीआयकडून आम्हाला पुढील डिटेल्स मिळतील. मालदीव किंवा श्रीलंका येथून ऑस्ट्रेलियात जाण्यासाठी बीसीसीआय चार्टर्ड फ्लाईट्सचीही सोय करणार आहेत. बीसीसीआय त्यांच्याकडून सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.  Fact Check : महेंद्रसिंग धोनीनं IPL २०२१मधून मिळणारा १५ कोटींचा पगार कोरोना लढ्यासाठी केला दान!

द. आफ्रिकेच्या खेळाडूंना मिळालं ग्रीन सिग्नल!

आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची घरवापसी होणार असून त्यांना सात दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागेल. दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानं कागिसो रबाडा व अॅनरिच नॉर्ट्झे यांच्यात भीतीचे वातावरण आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात फॅफ ड्यू प्लेसिस, इम्रान ताहीर व लुंगी एनगीडी यांनाही कोरोनाची भीती आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिका सरकारनं खेळाडूंना मायदेशात परतण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यांना होम क्वारंटाईन व्हावे लागेल. आयपीएलमध्ये जवळपास १४ खेळाडू व प्रशिक्षक सहाभागी झाले होते. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021 Suspended : Saw it coming, nothing more important than saving human lives: Shoaib Akhtar on IPL 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app