IPL 2021 SRH vs RCB Live T20 Score : SRH won the toss and decided to bowl first, know both team playing XI | IPL 2021 : SRH vs RCB T20 Live : सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकली, RCBचा स्फोटक फलंदाज परतला

IPL 2021 : SRH vs RCB T20 Live : सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकली, RCBचा स्फोटक फलंदाज परतला

ipl 2021  t20 SRH vs RCB live match score updates  chennai : विजयाने सुरुवात करणाऱ्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ( RCB) संघाला आयपीएलच्या १४ व्या पर्वात आज सनरायजर्स हैदराबादच्या ( SRH) आव्हानाला सामोरे जायचे आहे. आरसीबीने उद्धाटनीय सामन्यात पाचवेळचा विजेता संघ मुंबई इंडियन्सचा ( MI) पराभव करत स्पर्धेत विजयी सुरुवात केली. SRHला सलामी लढतीत कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. आजच्या सामन्यात SRHनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

SRH vs RCB यांच्यातल्या १८ पैकी १० सामन्यांत हैदराबादनं बाजी मारली आहे, तर ७ वेळा बंगलोर जिंकलं असून १ सामना अनिर्णीत राहिला. 

डेव्हिड वॉर्नरनं आयपीएलमध्ये RCBविरुद्ध ७०० धावा केल्या आहेत. महेंद्रसिंग धोनी ८२३ आणि रोहित शर्मा ७१६ धावांसह आघाडीवर आहेत. वॉर्नरला रोहितचा विक्रम मोडण्याची आज संधी आहे. आयपीएलमध्ये हैदराबादविरुद्ध सर्वाधिक ५५६ धावांचा विक्रम शेन वॉटसनच्या नावावर आहे. त्यानंतर विराट कोहली ( ५३१) व एबी डिव्हिलियर्स ( ५२०) यांचा क्रमांक येतो.  

हैदराबादच्या संघात दोन बदल - शाहबाज नदीम व जेसन होल्डर IN, संदीप शर्मा व मोहम्मद नबी OUT

बंगलोर संघात एक बदल - देवदत्त पडीक्कल IN, रजत पाटीदार OUT

सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad XI) - डेव्हिड वॉर्नर, वृद्धीमान सहा, मनीष पांडे, जॉनी बेअरस्टो, विजय शंकर, जेसन होल्डर, अब्दुल समद, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, शाहबाद नदीम, टी नटराजन ( D Warner, W Saha, M Pandey, J Bairstow, V Shankar, J Holder, A Samad, R Khan, B Kumar, S Nadeem, T Natarajan )

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( Royal Challengers Bangalore XI) - विराट कोहली, देवदत्त पडीक्कल, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, डॅनीएल ख्रिस्टीयन, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाद अहमद, कायले जेमिन्सन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल ( V Kohli, D Padikkal, AB de Villiers, G Maxwell, D Christian, W Sundar, S Ahmed, K Jamieson, H Patel, M Siraj, Y Chahal)  

 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021 SRH vs RCB Live T20 Score : SRH won the toss and decided to bowl first, know both team playing XI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.