IPL 2021 : SRH vs RCB T20 Live : हैदराबादच्या गोलंदाजांनी RCBला नाचवलं; ग्लेन मॅक्सवेलनं पाच वर्षांनंतर पहिलं अर्धशतक झळकावलं

ipl 2021  t20 SRH vs RCB live match score updates chennai : संथ खेळपट्टीवर सनरायझर्स हैदराबादच्या ( Sunrisers Hyderabad) गोलंदाजांनी रॉयल चॅलेंजर बंगलोर ( Royal Challengers Bangalore) च्या तगड्या फलंदाजांना धावांसाठी संघर्ष करायला लावला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 09:11 PM2021-04-14T21:11:18+5:302021-04-14T21:16:04+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 SRH vs RCB Live T20 Score : Glenn Maxwell first IPL fifty in 5 years and after 40 long innings, RCB 8/149 | IPL 2021 : SRH vs RCB T20 Live : हैदराबादच्या गोलंदाजांनी RCBला नाचवलं; ग्लेन मॅक्सवेलनं पाच वर्षांनंतर पहिलं अर्धशतक झळकावलं

IPL 2021 : SRH vs RCB T20 Live : हैदराबादच्या गोलंदाजांनी RCBला नाचवलं; ग्लेन मॅक्सवेलनं पाच वर्षांनंतर पहिलं अर्धशतक झळकावलं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ipl 2021  t20 SRH vs RCB live match score updates chennai : संथ खेळपट्टीवर सनरायझर्स हैदराबादच्या ( Sunrisers Hyderabad) गोलंदाजांनी रॉयल चॅलेंजर बंगलोर ( Royal Challengers Bangalore) च्या तगड्या फलंदाजांना धावांसाठी संघर्ष करायला लावला. विराट कोहली व ग्लेन मॅक्सवेल बराच वेळ खेळपट्टीवर होते, पंरतु त्यांनाही मोठी खेळी करता आली नाही.  ग्लेन मॅक्सवेलनं अखेरपर्यंत खिंड लढवून संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. पण, या माफक लक्ष्याचा बचाव करताना RCBच्या गोलंदाजांना अथक मेहनत घ्यावी लागेल, हे निश्चित आहे. पाच वर्षानंतर मॅक्सवेलनं आयपीएलमध्ये पहिले अर्धशतक झळकावलं.  IPL 2021 : SRH vs RCB  T20 Live Score Update

कोरोनावर मात करून प्रथमच मैदानावर उतरलेल्या देवदत्त पडीक्कलवर सर्वांचे लक्ष होते. त्यानं दोन चौकार मारून सर्वांच्या अपेक्षा उंचवल्या, परंतु भुवनेश्वर कुमारनं त्याला मोठी खेळी करू दिली नाही. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या शाहबाज अहमदनं आत्मविश्वासानं खेळ करताना विराटला उत्तम साथ दिली. अहमद १४ धावांवर बाद झाला. नदीमनं टाकलेल्या या सातव्या षटकात एक धाव देत एक विकेट घेतली. IPL 2021 SRH vs RCB Live T20 Score  विराट कोहलीचं हे वागणं बरं नव्हं, बाद झाला म्हणून रागात केली ही कृती

शाहबाज नदीमच्या फिरकीवर फटके मारताना ग्लेन मॅक्सवेल चाचपडताना दिसला. त्यानं टाकलेल्या ९ चेंडूंत मॅक्सवेलला २ धावाच घेता आल्या. RCBला पहिल्या दहा षटकांत २ बाद ६३ धावा करता आल्या. ११व्या षटकात मॅक्सवेलनं गिअर बदलला अन् नदीमनं टाकलेल्या पहिल्या चार चेंडूंत १७ ( २ षटकार व १ चौकार) धावा कुटून काढल्या. नदीमनं ४ षटकांत ३६ धावांत १ विकेट घेतली. यातील चौथ्या षटकात २२ धावा आल्या. RCBची गाडी आता सुसाट धावेल असे वाटत असताना १३व्या षटकात जेसन होल्डरनं पहिल्याच चेंडूवर विराटला ( ३३) माघारी पाठवले. विराट-ग्लेननं ३८ चेंडूंत ४४ धावांची भागीदारी केली. होल्डरनं त्या षटकात १ धाव देत विकेट घेतली. SRH vs RCB, SRH vs RCB live score, IPL 2021, IPL 2021 latest news 


टी नटराजनला रिप्लेस करून SRH कर्णधार वॉर्नरनं राशिद खानला पुन्हा गोलंदाजीसाठी बोलावलं. त्याची ही ट्रिक यशस्वी ठरली. एबी डिव्हिलियर्स १ धाव करून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला उभ्या असलेल्या वॉर्नरच्या हाती झेल देऊन माघारी परतला. विजय शंकर व मनीष पांडे यांनी अफलातून झेल टिपले. राशिदनं १८ धावांत २ विकेट्स घेतल्या. मॅक्सवेलनं ४१ चेंडूंत ५९ धावा केल्या ( ५ चौकार व ३ षटकार). आरसीबीला २० षटकांत ८ बाद १४९ धावा करता आल्या.

Web Title: IPL 2021 SRH vs RCB Live T20 Score : Glenn Maxwell first IPL fifty in 5 years and after 40 long innings, RCB 8/149

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.