IPL 2021 RR vs PBKS Live T20 Score : Who's catching it? Md. Shami calls for it, Ben Stokes out for duck, Watch Video | IPL 2021 : RR vs PBKS T20 Live : झेल तू घेतोस की मी?; कॅच पकडण्यासाठी तिघे धावले अन्..., Video

IPL 2021 : RR vs PBKS T20 Live : झेल तू घेतोस की मी?; कॅच पकडण्यासाठी तिघे धावले अन्..., Video

IPL 2021 : RR vs PBKS T20 Live Score Update : २२२ धावांच्या तगड्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सला ( Rajasthan Royals) अपेक्षित सुरुवात करता आली नाही. मोहम्मद शमीनं टाकलेल्या पहिल्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर बेन स्टोक्स ( Ben Stokes) यानं मारलेला फटका जागच्या जागी उंच उडाला. तो चेंडू झेलण्यासाठी यष्टिरक्षक लोकेश राहुल, शमी आणि आणखी एक खेळाडू धावला. झेल तू घेतोस की मी, अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु, शमीनं तो टिपला अन् स्टोक्सन शून्यावर माघारी परतला. 

WICKET! ☝️ A bit of a chaos as the three players converge but Shami does well to complete that catch to dismiss Ben Stokes. 👏👏 #VIVOIPL vivo #RRvPBKS Follow the match 👉 bit.ly/IPL-2021-04

Posted by IPL - Indian Premier League on Monday, April 12, 2021

पाहा व्हिडीओ...
 

All's well that ends well for Punjab Kings! 😎😎 3 players circling under that ball 3 of them collide... ...but...

Posted by IPL - Indian Premier League on Monday, April 12, 2021

दीपक हुडा ( Deepak Hooda), लोकेश राहुल ( KL Rahul) आणि ख्रिस गेल ( Chris Gayle) या त्रिकुटानं राजस्थान रॉयल्सच्या ( Rajasthan Royals) गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. दीपक हुडा व लोकेश राहुल या जोडीनं ४७ चेंडूंत १०५ धावांची भागीदारी करताना पंजाब किंग्सला ( Punjab Kings) दोनशेपार धावा करून दिल्या. लोकेश राहुल ५० चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह  ९१ धावांवर माघारी परतला. RRच्या चेतन सकारियानं ३१ धावांत ३ विकेट्स अन् एक अफलातून झेल घेत आपली छाप सोडली. लोकेश राहुलला दोन जीवदान मिळाले आणि त्याचाच फटका RRला बसला. ipl 2021  t20 RR vs PBKS live match score updates Mumbai

४१ वर्षीय ख्रिस गेलनं आजच्या सामन्यात ३५०वा षटकार खेचून आयपीएलमध्ये मोठा विक्रम नावावर केला. २८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४० धावा करणाऱ्या गेलचा झेल बेन स्टोक्सनं टिपला.  दीपक हुडानं  २८ चेंडूंत ६४ धावा कुटल्या. त्यापैकी ५२ धावा या केवळ चौकार व षटकारानं आल्या ( ४ चौकार व ६ षटकार). पंजाब किंग्सनं २० षटकांत ६ बाद २२१ धावांचा डोंगर उभा केला. IPL 2021 : RR vs PBKS T20 Live Score Update

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021 RR vs PBKS Live T20 Score : Who's catching it? Md. Shami calls for it, Ben Stokes out for duck, Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.