IPL 2021 : RR vs PBKS T20 Live : राहुलनं राहुलला बाद केलं, पंजाब किंग्सच्या कर्णधाराचं शतक हुकलं; पण RRसमोर तगडं आव्हान उभं केलं

IPL 2021 : RR vs PBKS T20 Live Score Update : दीपक हुडा ( Deepak Hooda), लोकेश राहुल ( KL Rahul) आणि ख्रिस गेल ( Chris Gayle) या त्रिकुटानं राजस्थान रॉयल्सच्या ( Rajasthan Royals) गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 09:31 PM2021-04-12T21:31:50+5:302021-04-12T21:32:45+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 RR vs PBKS Live T20 Score : KL Rahul missed century at Wankhede, Rahul Tewatia take brilliant Catch, PBKS 6/221 | IPL 2021 : RR vs PBKS T20 Live : राहुलनं राहुलला बाद केलं, पंजाब किंग्सच्या कर्णधाराचं शतक हुकलं; पण RRसमोर तगडं आव्हान उभं केलं

IPL 2021 : RR vs PBKS T20 Live : राहुलनं राहुलला बाद केलं, पंजाब किंग्सच्या कर्णधाराचं शतक हुकलं; पण RRसमोर तगडं आव्हान उभं केलं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021 : RR vs PBKS T20 Live Score Update : दीपक हुडा ( Deepak Hooda), लोकेश राहुल ( KL Rahul) आणि ख्रिस गेल ( Chris Gayle) या त्रिकुटानं राजस्थान रॉयल्सच्या ( Rajasthan Royals) गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. दीपक हुडा व लोकेश राहुल या जोडीनं ४७ चेंडूंत १०५ धावांची भागीदारी करताना पंजाब किंग्सला ( Punjab Kings) दोनशेपार धावा करून दिल्या. यंदाच्या आयपीएलमध्ये दोनशेपार धावांची ही पहिलीच खेळी ठरली. लोकेश राहुलला शतकानं हुलकावणी दिली. ५० चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह तो ९१ धावांवर माघारी परतला. राहुल टेवाटियानं सीमारेषेवर अफलातून झेल टिपला. IPL 2021 : RR vs PK T20 Live Score Update

 लोकेश राहुलला दोन जीवदान RRला महागात पडले
सौराष्ट्रच्या चेतन सकारीयानं राजस्थान रॉयल्ससाठी पहिलं षटक फेकलं. पदार्पण करणाऱ्या मुश्ताफिजूर रहमान यानं टाकलेल्या दुसऱ्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर लोकेश राहुल ( KL Rahul) पायचीत असल्याची अपील झाली. DRS घेऊ की नको यासाठी थोडीचर्चा झाली, परंतु कर्णधार संजू सॅमसननं DRS घेतला नाही. त्यानंतर रिप्लेत लोकेश बाद असल्याचे दिसत होते आणि ही चूक राजस्थानला महागात पडू शकते. पण, चेतन सकारियानं ( Chetan Sakariya) तिसऱ्या षटकात पंजाबला धक्का दिला. त्यानं मयांक अग्रवालला ( १४) यष्टिरक्षक संजू सॅमसनकरवी झेलबाद केले. ७व्या षटकात बेन स्टोक्सनं लोकेश राहुलचा झेल सोडला. ipl 2021  t20 RR vs PBKS live match score updates Mumbai दीपक हुडाची फटकेबाजी पाहून RRला भरली 'हुडहुडी'; आयपीएल इतिहासात नोंदवला मोठा विक्रम

३५० षटकारांचा विक्रम अन् ४१ वर्षीय गेलची फटकेबाजी
राहुल टेवाटियानंही त्याच्याच गोलंदाजीवर गेलचा झेल सोडला. गेलनं या सामन्यात मोठा विक्रम केला आहे आणि आयपीएलमध्ये हा विक्रम करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. गेलनं आयपीएलमध्ये ३५० षटकारांचा विक्रम केला. त्यानंतर एबी डिव्हिलियर्स ( २३७), महेंद्रसिंग धोनी ( २१६), रोहित शर्मा ( २१४), विराट कोहली ( २०१) यांचा क्रमांक येतो. रियान परागनं ( Riyan Parag) १०व्या षटकात गेलला माघारी जाण्यास भाग पाडले. २८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४० धावा करणाऱ्या गेलचा झेल बेन स्टोक्सनं टिपला.  गेल व राहुलची ४५ चेंडूंत ६७ धावांची भागीदारी संपुष्टात आली. IPL 2021 : RR vs PBKS T20 Live Score Update   वडील टेम्पो चालक, तीन महिन्यांपूर्वी भावानं केली आत्महत्या अन् आज RR कडून पदार्पणात घेतली मोठी विकेट


हुडानं भरवली हुडहुडी...
राहुलनं संधीचं सोनं करताना ३० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. गेल माघारी परतल्यानंतर निकोलस पूरन येणं अपेक्षित होतं, पंरतु PBKS नं स्ट्रॅटेजी बदलली अन् दीपक हुडाला ( Deepak Hooda) पुढे पाठवले आणि त्यानं षटकारांची आतषबाजी करताना हा निर्णय योग्य ठरवला. ४० धावांवर असताना जोस बटलरनं दीपकला जीवदान दिलं. पंजाबनं १५ षटकांत २ बाद १६१ धावा चोपून दोनशेपारच्या दिशेनं पाऊल टाकले. लोकेशनं अर्धशतक पूर्ण केले. पण, दीपक हुडानं सर्वांचे लक्ष वेधले. त्यानं २० चेंडूंत १ चौकार व ६ षटकारांसह अर्धशतक पूर्ण केलं. आयपीएलमध्ये २३हून कमी चेंडूंत दोन अर्धशतक झळकावणारा तो पहिलाच अनकॅप खेळाडू ठरला. त्यानं २०१५मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं.  IPL 2021, IPL 2021 latest news, RR vs PBKS IPL Matches

दीपक हुडानं चोपल्या १० चेंडूंत ५२ धावा
दीपक हुडानं PBKSच्या ताफ्यातील वातावरणच बदललं. त्यानं २८ चेंडूंत ६४ धावा कुटल्या. त्यापैकी ५२ धावा या केवळ चौकार व षटकारानं आल्या ( ४ चौकार व ६ षटकार) . दरम्यान लोकेश राहुलनंही पंजाबकडून २००० धावा पूर्ण केल्या.  पंजाब किंग्सनं २० षटकांत ६ बाद २२१ धावांचा डोंगर उभा केला. 
 

Web Title: IPL 2021 RR vs PBKS Live T20 Score : KL Rahul missed century at Wankhede, Rahul Tewatia take brilliant Catch, PBKS 6/221

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.