IPL 2021: ऋषभ पंतचे धैर्य प्रभावित करणारे - शिखर धवन

Shikhar Dhawan : धवन म्हणाला, ‘पंतने शानदार कामगिरी केली. सर्वप्रथम आनंदाची बाब म्हणजे त्याने नाणेफेक जिंकली. या खेळपट्टीनंतर नंतर फलंदाजी करणे चांगले असते. त्याने धैर्य कायम राखत खेळाडूंना प्रेरित केले.'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 06:52 AM2021-04-12T06:52:33+5:302021-04-12T06:53:07+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021: Rishabh Pant's Courage Affected - Shikhar Dhawan | IPL 2021: ऋषभ पंतचे धैर्य प्रभावित करणारे - शिखर धवन

IPL 2021: ऋषभ पंतचे धैर्य प्रभावित करणारे - शिखर धवन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी सलामीवीर फलंदाज शिखर धवन युवा ऋषभ पंतच्या नेतृत्व क्षमतेमुळे प्रभावित झाला आहे. यष्टिरक्षक फलंदाजाने कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या लढतीत धैर्यासह संघाचे नेतृत्व केले आणि अनुभवासह तो आणखी चांगला होईल, असे धवन म्हणाला. नियमित कर्णधार श्रेयस अय्यर अलीकडेच इंग्लंडवरुद्ध वन-डे आंतरराष्ट्रीय मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त झाल्यामुळे स्पर्धेतून बाहेर झाला. त्यानंतर पंतकडे नेतृत्व सोपविण्यात आले. २३ वर्षीय या यष्टिरक्षक फलंदाजाने नेतृत्वाची शानदार सुरुवात केली.  
धवन म्हणाला, ‘पंतने शानदार कामगिरी केली. सर्वप्रथम आनंदाची बाब म्हणजे त्याने नाणेफेक जिंकली. या खेळपट्टीनंतर नंतर फलंदाजी करणे चांगले असते. त्याने धैर्य कायम राखत खेळाडूंना प्रेरित केले. त्याने चांगले बदल केले. कर्णधार म्हणून त्याची ही पहिली लढत होती. त्यामुळे अनुभवासह तो अधिक परिपक्व होईल, असा मला विश्वास आहे.’
धवन पुढे म्हणाला, ‘ऋषभबाबत सर्वोत्तम बाब म्हणजे तो धैर्य कायम राखतो. तो हुशार आहे.’ सिनियर खेळाडू असल्यामुळे पंतला सल्ला देणार का, याबाबत धवन म्हणाला, नक्कीच मी सल्ला देणार. युवा खेळाडू ज्यावेळी माझ्यासोबत फलंदाजी किंवा मानसिक बाबींबाबत माझ्यासोबत चर्चा करतात त्यावेळी मी आपली माहिती नेहमी शेअर करतो.’
धवनने ५४ चेंडूंना सामोरे जाताना १० चौकार व २ षटकारांच्या मदतीने ८५ धावांची खेळी केली आणि पृथ्वी शॉसोबत (७२) सलामीला १३८ धावांची भागीदारी केली.

युवा खेळाडूला सल्ला देणार 
सिनियर खेळाडू असल्यामुळे पंतला सल्ला देणार का, याबाबत बोलताना धवन म्हणाला, नक्कीच मी सल्ला देणार. युवा खेळाडू ज्यावेळी माझ्यासोबत फलंदाजी     किंवा मानसिक बाबींबाबत माझ्यासोबत चर्चा करतात त्यावेळी मी आपली माहिती नेहमी शेअर करतो.’

Web Title: IPL 2021: Rishabh Pant's Courage Affected - Shikhar Dhawan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.