IPL 2021 : रिकी पाँटिंग बोलतात तेव्हा Backgroundला 'चक दे'चं गाणं वाजवायला हवं; पृथ्वी शॉचं विधान, Video

विजय हजारे ट्रॉफीत २१ वर्षीय पृथ्वीनं ८ सामन्यांत ८२७ धावा चोपल्या. पुद्दूचेरीविरुद्ध त्यानं नाबाद २२७ धावांची विक्रमी खेळी केली. शिवाय सौराष्ट्र व कर्नाटकविरुद्ध त्यानं अनुक्रमे १८५* व १६५ धावांची खेळीही केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 12:50 PM2021-04-07T12:50:50+5:302021-04-07T12:53:02+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021: Ricky Ponting’s motivational talks should be played with ‘Chak De’ in the background: Prithvi Shaw | IPL 2021 : रिकी पाँटिंग बोलतात तेव्हा Backgroundला 'चक दे'चं गाणं वाजवायला हवं; पृथ्वी शॉचं विधान, Video

IPL 2021 : रिकी पाँटिंग बोलतात तेव्हा Backgroundला 'चक दे'चं गाणं वाजवायला हवं; पृथ्वी शॉचं विधान, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL ) १३व्या पर्वातील अपयशानंतर पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) यंदा कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत पृथ्वीनं सर्वच रेकॉर्ड मोडले होते, परंतु त्यानंतरही त्याला वन डे मालिकेत संधी मिळाली नाही. त्यामुळे आयपीएल २०२१ ( IPL 2021) मधून चांगली कामगिरी करून भारतीय संघात पुनरागमन करण्याचा त्याचा निर्धार आहे. २०१८मध्ये पृथ्वीनं आयपीएलमध्ये पदार्पण केलं आणि काही धडाकेबाज खेळी केल्याही. पण, २०२०मध्ये त्याला १३ सामन्यांत केवळ २२८ धावा करता आल्या. IPL 2021 : सुरेश रैनाची माघार ते सुनील गावस्कर यांची अनुष्का शर्मावरील वादग्रस्त कमेंट; IPL 2020मधील मोठे वाद!

पण, २०२१मध्ये रिकी पाँटिंगच्या ( Ricky Ponting) मार्गदर्शनाखाली पृथ्वी यंदा त्याचा खेळ उंचावण्याच्या प्रयत्नात आहे. पृथ्वीनं मुख्य प्रशिक्षक पाँटिंग यांचे कौतुक केले. पण, ते करताना त्यानं म्हटलं की, जेव्हा रिकी पाँटिंग प्रेरणादायी भाषण देत असतात तेव्हा बॅक ग्राऊंडला 'चक दे इंडिया' चं गाणं वाजवायला हवं. ''बॉस परतले. ते खूप चांगली व्यक्ती आहेत. मैदानावर ते बॉस असतात आणि मैदानाबाहेर मीत्र. यावर्षी कशी कामगिरी होते ते पाहूयात. जेव्हा रिकी सर बोलतात तेव्हा मागे शाहरुख खान यांच्या चक दे इंडियाचं गाणं वाजवायला हवं. IPL 2021 : प्रथमच खेळताना 'हे' खेळाडू दम दाखवणार; आयपीएलच्या १४व्या पर्वाची संपूर्ण माहिती एका क्लिकवर   

विजय हजारे ट्रॉफीत २१ वर्षीय पृथ्वीनं ८ सामन्यांत ८२७ धावा चोपल्या. पुद्दूचेरीविरुद्ध त्यानं नाबाद २२७ धावांची विक्रमी खेळी केली. शिवाय सौराष्ट्र व कर्नाटकविरुद्ध त्यानं अनुक्रमे १८५* व १६५ धावांची खेळीही केली होती.  IPL 2021 : RCBच्या अडचणीत आणखी भर, देवदत्त पडिक्कलनंतर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

धावा निघत नसतील तेव्हा पृथ्वी शॉ...; कोच रिकी पॉँटिंगचा मोठा खुलासा

नवी दिल्ली : आयपीएलच्या मागच्या पर्वात पृथ्वी शॉ अपयशी ठरत होता. त्यावेळी तो नेट्‌समध्ये फलंदाजीसाठी सरावाला देखील येत नसे, असा खुलासा दिल्ली कॅपिटल्सचे कोच रिकी पाँटिंग यांनी केला. या प्रतिभावान फलंदाजाला आयपीएल सुरू होण्याआधी सरावातील सवयी सुधाराव्या लागतील, यावर कोचने भर दिला आहे.

‘पृथ्वी काय बोलला, हे थोडावेळ मला कळलेच नाही. आता मात्र तो बदलला असावा. मागच्या काही महिन्यांपासून त्याने भरपूर मेहनत घेतली. पृथ्वीचा सरावाचा सिद्धांत बदलला असावा, अशी अपेक्षा करतो. त्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्यास तो सुपरस्टार खेळाडू बनू शकतो,’ असे पॉंटिंग म्हणाले.
 

Web Title: IPL 2021: Ricky Ponting’s motivational talks should be played with ‘Chak De’ in the background: Prithvi Shaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.