IPL 2021: रिकी पाँटिंग नेहमी 'क्लीन शेव' का करतो माहित्येय? घटस्फोट मिळण्याच्या भितीनं!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 01:12 PM2021-04-11T13:12:08+5:302021-04-11T13:12:46+5:30

IPL 2021, Ricky Ponting: ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार आणि दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यानेही एक अजब माहिती देत सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

IPL 2021 Ricky Ponting Reveals Reason Behind Going Clean Shaved Before Every Match | IPL 2021: रिकी पाँटिंग नेहमी 'क्लीन शेव' का करतो माहित्येय? घटस्फोट मिळण्याच्या भितीनं!

IPL 2021: रिकी पाँटिंग नेहमी 'क्लीन शेव' का करतो माहित्येय? घटस्फोट मिळण्याच्या भितीनं!

Next

मुंबई : कोरोनाच्या सावटाखाली सुरु झालेल्या आयपीएलच्या १४व्या सत्रामुळे देशवासीयांना मोठा दिलासा मिळाला. एकीकडे लॉकडाऊनचे संकट उभे असले, तरी आयपीएलमुळे मनासिक दडपण कमी होत असल्याने क्रिकेटप्रेमी सुखावले आहेत. त्यातच काही खेळाडू मैदानावरील कामगिरीने, तर काही खेळाडू मैदानाबाहेर राहून अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार आणि दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग (Ricky Ponting) यानेही एक अजब माहिती देत सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (IPL 2021 Ricky Ponting Reveals Reason Behind Going Clean Shaved Before Every Match)
 
आयपीएलमध्ये अनेक खेळाडू आपल्या अनोख्या स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतात. धोनीची हेअरस्टाईल, आंद्रे रसेलचे शूज, रवींद्र जडेजाचे गॉगल असे अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. मात्र, पाँटिंगसारखा दिग्गज नेहमी क्लीन शेवमध्ये राहत सर्वांचे लक्ष वेधून घेतो आणि आतातर यामागचे कारणही त्याने सांगितले आहे. सध्या क्रिकेटपटूंची दाढी एक फॅशन ठरलेली असताना, पाँटिंग क्लीन शेव करतो ते फॅशन म्हणून नाही, तर बायकोच्या भितीमुळे...

एका मुलाखतीमुळे पाँटिंगने सांगितले की, ‘जर मी दाढी वाढवली किंवा थोडी जरी दाढी माझ्या चेहºयावर दिसली आणि हे का जर माझ्या पत्नीने टीव्हीवर पाहिले, तर कदाचित ती मला घटस्फोट देईल.’ त्यामुळेच सध्या पाँटिंग चर्चेचा विषय ठरत आहे. एकीकडे, बहुतेक क्रिकेटपटू विविध प्रकारच्या दाढी ठेवत असताना पाँटिंगच्या क्लीन शेवचे गुपित समोर आले आहे. पाँटिंग दर दोन दिवसांनी क्लीन शेव करतो आणि त्याच्यासाठी हे आता नेहमीचे ठरले आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021 Ricky Ponting Reveals Reason Behind Going Clean Shaved Before Every Match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app