ipl 2021 rcb vs rr devdutt padikkal century royal challengers bangalore beat rajasthan royals by 10 wickets | IPL 2021, RCB vs RR, Live: वानखेडेवर 'पडिक्कल' वादळ; ठोकलं खणखणीत शतक, कोहलीनंही धुतलं, १० विकेट राखून विजय

IPL 2021, RCB vs RR, Live: वानखेडेवर 'पडिक्कल' वादळ; ठोकलं खणखणीत शतक, कोहलीनंही धुतलं, १० विकेट राखून विजय

IPL 2021, RCB vs RR, Live: आयपीएलमध्ये मुंबईच्या वानखेडेवर आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा दबदबा पाहायला मिळाला. राजस्थान रॉयल्स संघानं दिलेलं १७८ धावांचं आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं एकही विकेट न गमावता दिमाखात पूर्ण केलं. बंगलोरचा युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलनं आपलं पहिलं वहिलं शतक साजरं केलं. पडिक्कलनं गोलंदाजांच्या चिंधड्या उडवत ५२ चेंडूत नाबाद १०१ धावा केल्या. तर कोहलीनं ४७ चेंडूत नाबाद ७२ धावांची खेळी साकारली. 

राजस्थान रॉयल्सनं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पडिकल्ल यानं सुरुवातीपासूनच आपले मनसुबे स्पष्ट केले होते. पडिक्कलनं आपल्या भात्यातील नजाकती आणि आक्रमक फटक्यांचा नजराणा पेश करत उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. कोहलीनं संथ सुरुवात केली पण मैदानात जम बसवल्यानंतर त्यानंही रंग दाखवण्यास सुरुवात केली. शतकी भागीदारी झाल्यानंतर कोहलीनं टॉप गेअर टाकत दमदार फलंदाजी केली. कोहलीनं आजच्या  धावांच्या खेळीसह आयपीएलमध्ये ६ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. 

दरम्यान, राजस्थान रॉयल्सकडून शिवम दुबे आणि राहुल तेवतिया वगळता इतर कोणताही खेळाडू चांगली कामगिरी करू शकला नव्हता. शिवम दुबेनं सर्वाधिक ४६ धावांची खेळी साकारली. तर राहुल तेवतियानं २३ चेंडूत ४० धावांची दमदार खेळी साकारली. राजस्थानच्या सलामीच्या फलंदाजांकडून यावेळी निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. जोस बटलर, मनन वोहरा, कर्णधार संजू सॅमसन आणि डेव्हिड मिलर स्वस्तात बाद झाले होते. त्यानंतर शिवम दुबे आणि रियान पराग यांनी संघाचा डाव सावरत भागिदारी रचली होती. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ipl 2021 rcb vs rr devdutt padikkal century royal challengers bangalore beat rajasthan royals by 10 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.