IPL 2021: 'मेरा दिल भी कितना पागल है...'; राशिद खान बॉलिवूड गाणं गुणगुणत सराव करतो तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 01:32 PM2021-04-11T13:32:29+5:302021-04-11T13:34:04+5:30

IPL 2021, Rashid Khan: हैदराबादने एक हटके व्हिडिओ पोस्ट केला असून यामध्ये राशिद बॉलिवूड साँग गात असल्याचे दिसत आहे.

ipl 2021 rashid khan singing kumar sanu song goes viral on social media | IPL 2021: 'मेरा दिल भी कितना पागल है...'; राशिद खान बॉलिवूड गाणं गुणगुणत सराव करतो तेव्हा...

IPL 2021: 'मेरा दिल भी कितना पागल है...'; राशिद खान बॉलिवूड गाणं गुणगुणत सराव करतो तेव्हा...

Next

मुंबई : आयपीएलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अनेक दमदार खेळाडू दिले. केवळ भारतीयच नाही, तर अनेक विदेशी खेळाडूंनीही आयपीएलच्या माध्यमातून आपले नाणे खणखणीत वाजवलं आहे. यापैकी एक नामवंत खेळाडू म्हणजे अफगाणिस्तानचा राशिद खान. कल्पक लेगस्पिन आणि आक्रमक फटकेबाजी अशी क्षमता असलेला राशिद सध्या अफगाणिस्तानचा हुकमी एक्का आहे. सनरायझर्स हैदराबादचा ट्रम्प कार्ड असलेला राशिद आता यंदाच्या सत्रासाठीही सज्ज झाला आहे. आजच हैदराबाद आपल्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध भिडेल. मात्र, त्याआधी हैदराबादने एक हटके व्हिडिओ पोस्ट केला असून यामध्ये राशिद बॉलिवूड साँग गात असल्याचे दिसत आहे. (ipl 2021 rashid khan singing kumar sanu song goes viral on social media)

त्यामुळेच सध्या राशिदच्या खेळापेक्षा त्याच्या गायन कलेची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. अफगाणिस्तानमध्ये बॉलिवूड चित्रपट, अभिनेते-अभिनेत्री आणि गाणी यांची मोठी क्रेझ आहे. तिथे अमिताभ बच्चनपासून हृतिक रोशन यांचे अनेक चाहतेही आहेत. अफगाणिस्तानचे हे बॉलिवूड प्रेम आता आयपीएलमध्येही दिसून आले असून राशिदच्या रुपाने ते समोर आले आहे.


 
हैदराबादच्या सोशल मीडियाने ट्रेनिंग सेशनदरम्यान शूट केलेल्या व्हिडिओमध्ये राशिद खान आणि वेगवान गोलंदाज संदीप शर्मा यांच्यातील जुगलबंदी दिसून येत आहे. कुमार सानू यांनी गायलेल्या ‘मेरा दिल भी कितना पागल है, ये प्यार तो तुमसे करता है,’  हे गाणं गुणगुणत राशिद संदीप शर्मासोबत मस्ती करताना दिसतोय, तर संदीपनेही त्याला तशीच साथ दिली आहे.
 
हा व्हिडिओ पोस्ट करताना हैदराबादने कॅप्शन लिहिले आहे की, ‘ज्यांच्यामध्ये खूप सारे टॅलेंट आहेत, अशी माणसं..’ या व्हिडिओला सध्या ३० हजारांहून अधिक लाईक्स आणि १०० हून अधिक कमेंट्स आले आहेत. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ipl 2021 rashid khan singing kumar sanu song goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app