IPL 2021 : Rajasthan Royals' Liam Livingstone pulls out of IPL 2021 due to bubble fatigue | IPL 2021 : राजस्थान रॉयल्सच्या अडचणीत वाढ, बायो बबलमुळे आला थकवा अन् तगडा फलंदाज माघारी परतला!

IPL 2021 : राजस्थान रॉयल्सच्या अडचणीत वाढ, बायो बबलमुळे आला थकवा अन् तगडा फलंदाज माघारी परतला!

राजस्थान रॉयल्स संघासमोरील अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाही. दुखापतीमुळे जोफ्रा आर्चर व बेन स्टोक्स हे दोन प्रमुख खेळाडू आयपीएल २०२१ला मुकले असताना आणखी एका खेळाडूनं बायो बबलला कंटाळून माघार घेतली आहे. इंग्लंडचा फलंदाज लायम लिव्हिंगस्टोन (  Liam Livingstone ) यानं बायो बबलमुळे जाणवत असलेल्या थकव्यामुळे माघार घेण्याचा निर्णय घेतला. सोमवारी तो मायदेशी परतला. 

''सोमवारी लायम लिव्हिंगस्टोन मायदेशी परतला. तो गेली एक वर्ष बायो बबलमध्ये आहे आणि त्यामुळे त्याला थकवा जाणवत होता. त्याच्या या निर्णयाचा आम्ही आदर करतो. संघाला जमेल तसा पाठिंबा तो देत राहील,''असे राजस्थान रॉयल्सनं त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. 


मागील आठवड्यात बेन स्टोक्सनं बोटाच्या दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएलमधून माघार घेतली. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात ख्रिस गेलचा झेल टिपताना त्याच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. त्याच्या बोटावर शस्त्रक्रिया करावी लागणार असून तो १२ आठवडे क्रिकेटपासून दूर राहणार असल्याचे इंग्लंड क्रिकेट बोर्डानं स्पष्ट केलं.  संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणारा राजस्थान रॉयल्सला तीनपैकी एकच सामना जिंकता आलेला आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021 : Rajasthan Royals' Liam Livingstone pulls out of IPL 2021 due to bubble fatigue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.