नाद करायचा न्हाय! अश्विननं मॉर्गनला असं दिलं प्रत्युत्तर, शून्यावर बाद करत केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा...

IPL 2021, KKR vs DC: आयपीएलमध्ये आज शारजावर सुरू असलेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 06:44 PM2021-09-28T18:44:02+5:302021-09-28T18:48:51+5:30

whatsapp join usJoin us
ipl 2021 r Ashwin takes Revenge to eoin morgan taking his wicket watch video | नाद करायचा न्हाय! अश्विननं मॉर्गनला असं दिलं प्रत्युत्तर, शून्यावर बाद करत केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा...

नाद करायचा न्हाय! अश्विननं मॉर्गनला असं दिलं प्रत्युत्तर, शून्यावर बाद करत केलं जोरदार सेलिब्रेशन, पाहा...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, KKR vs DC: आयपीएलमध्ये आज शारजावर सुरू असलेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. दिल्लीच्या डावात अश्विन बाद झाल्यानंतर कोलकाताचा गोलंदाज टीम साऊदीनं अश्विनला डिवचलं होतं. अश्विन देखील साऊदीला प्रत्युत्तर देताना पाहायला मिळाला. त्यानंतर कर्णधार इयॉन मॉर्गन देखील साऊदीच्या बचावासाठी पुढे येत अश्विनला डिवचू लागला. मग काय अश्विन थेट मॉर्गनवर धावून गेला होता. यात यष्टीरक्षक दिनेश कार्तिकनं मध्यस्थी करत अश्विनला माघारी पाठवलं होतं. 

दिल्लीच्या डावाच्या अखेरच्या षटकात घडलेल्या या प्रसंगाची कोलकाताच्या डावात देखील प्रचिती पाहायला मिळाली. इयॉन मॉर्गन फलंदाजीसाठी येताच आर.अश्विनला गोलंदाजीसाठी पाचारण केलं गेलं. अश्विननं मॉर्गनला आपल्या फिरकी जाळ्यात ओढत स्लिपकरवी झेलबाद केलं आणि मॉर्गनला शून्यावर माघारी धाडलं. मॉर्नगची विकेट घेतल्याचं अश्विननं जोरदार सेलिब्रेशन केलं. त्याच्या सेलिब्रेशनमध्ये मॉर्गनला जशास तसं प्रत्युत्तर दिल्याची भावना दिसून आली. मॉर्गन थेट मान खाली टाकून तंबूकडे रवाना होताना दिसला.  

अश्विनसोबत नेमकं काय घडलं होतं पाहा...

अश्विननं असं दिलं प्रत्युत्तर...

Web Title: ipl 2021 r Ashwin takes Revenge to eoin morgan taking his wicket watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.