IPL 2021, PK Vs RCB T20 Live : ४.८ कोटींचा पाऊस, २९८ धावांची वादळी खेळी; पंजाब किंग्सच्या प्रभसिमरन सिंगचा करिष्मा आज चाललाच नाही 

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हे दोन्ही संघ कामगिरीचा आलेख उंचावण्यासाठी मैदानावर उतरले, परंतु पंजाब किंग्सला सामन्यापूर्वीच धक्का बसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 08:01 PM2021-04-30T20:01:32+5:302021-04-30T20:02:24+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, PK Vs RCB  T20 Live : Prabhsimran Singh goes for 7 in 7 balls, PBKS brought him to 4.8 crore, know about him  | IPL 2021, PK Vs RCB T20 Live : ४.८ कोटींचा पाऊस, २९८ धावांची वादळी खेळी; पंजाब किंग्सच्या प्रभसिमरन सिंगचा करिष्मा आज चाललाच नाही 

IPL 2021, PK Vs RCB T20 Live : ४.८ कोटींचा पाऊस, २९८ धावांची वादळी खेळी; पंजाब किंग्सच्या प्रभसिमरन सिंगचा करिष्मा आज चाललाच नाही 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ipl 2021 t20 PK Vs RCB live match score updates Ahmedabad : आयपीएल २०२१मध्ये कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरलेल्या पंजाब किंग्ससमोर ( Punjab Kings) रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे ( Royal Challengers Banglore) तगडे आव्हान आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हे दोन्ही संघ कामगिरीचा आलेख उंचावण्यासाठी मैदानावर उतरले, परंतु पंजाब किंग्सला सामन्यापूर्वीच धक्का बसला. मयांक अग्रवाल दुखापतीमुळे आजच्या सामन्याला मुकला अन् त्याच्याजागी प्रभसिमरन सिंग ( Prabhsimran Singh) याला संधी देण्यात आली. IPL 2021 : PK Vs RCB T20 Live Score Update

सहा सामन्यांत पाच विजयांसह RCB तिसऱ्या क्रमांकावर आहेत, तर PBKSला सहापैकी दोनच सामने जिंकता आले आहेत. विराटनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. बँगलोरनं शाहबाज अहमदला संघात घेतले आहे, त्याच्यासाठी वॉशिंग्टन सुंदरला विश्रांती देण्यात आली आहे. पंजाबच्या संघात मोईजेस हेन्रीक्स, मयांक अग्रवाल व अर्षदीप सिंग यांना आजच्या सामन्यात मुकावे लागणार आहे. त्यामुळे ख्रिस गेल व लोकेश राहुल सलामीला येण्याची शक्यता आहे. नव्या सहकाऱ्यासह मैदानावर उतरलेल्या लोकेश राहुलनं( KL Rahul)  चांगली सुरूवात केली, परंतु प्रभसिमरन ७ धावांवर माघारी परतला. कायले जेमिन्सनं त्याला बाद केले. 


कोण आहे प्रभसिमरन सिंग ?
आयपीएल २०१९च्या ऑक्शनमध्ये पटियालाच्या या यष्टिरक्षक-फलंदाजाला ४.८ कोटींत पंजाब किंग्सनं आपल्या ताफ्यात दाखल केले होते. त्यानं २३ वर्षांखालील जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत ३०१ चेंडूंत २९८ धावांची वादळी खेळी केली होती आणि त्यामुळे तो प्रसिद्धीझोतात आला होता. त्यान भारताला गतवर्षी १९ वर्षांखालील आशिया चषक जिंकून दिला होता. हार्ड-हिटर फलंदाज म्हणून प्रभसिमरन ओळखला जातो. आजच्या सामन्यापूर्वी त्याला एकच सामन्यात संधी मिळाली होती आणि त्यात त्यानं ३ धावा केल्या होत्या.  त्यानं १२ लिस्ट ए क्रिकेट सामन्यांत ३५५ धावा केल्या, त्यात १ शतक व १ अर्धशतक आहे. २३ ट्वेंटी-२० सामन्यांत त्याच्या नावावर ६०३ धावा आहेत.

Web Title: IPL 2021, PK Vs RCB  T20 Live : Prabhsimran Singh goes for 7 in 7 balls, PBKS brought him to 4.8 crore, know about him 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.