IPL 2021, PBKS Vs RCB T20 Live : ख्रिस गेल बाद झाला अन् पंजाबचा डाव गडगडला; कर्णधार लोकेश राहुल एकटाच भिडला!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 09:13 PM2021-04-30T21:13:20+5:302021-04-30T21:17:43+5:30

ipl 2021 t20 PBKS Vs RCB live match score updates Ahmedabad : पंजाब किंग्सनं पहिल्या १० षटकांत ९० धावा केल्या होत्या. ख्रिस गेल बाद झाला तेव्हा पंजाबनं १०.४ षटकांत २ बाद ९९ धावा केल्या होत्या. पण, त्यानंतर अखेरच्या १० षटकांत पंजाबच्या धावांचा वेग मंदावला.

IPL 2021, PBKS Vs RCB  T20 Live : KL Rahul (91*), Gayle (46) guide Punjab Kings to 179/5 against Royal Challengers Bangalore | IPL 2021, PBKS Vs RCB T20 Live : ख्रिस गेल बाद झाला अन् पंजाबचा डाव गडगडला; कर्णधार लोकेश राहुल एकटाच भिडला!

IPL 2021, PBKS Vs RCB T20 Live : ख्रिस गेल बाद झाला अन् पंजाबचा डाव गडगडला; कर्णधार लोकेश राहुल एकटाच भिडला!

Next

ipl 2021 t20 PBKS Vs RCB live match score updates Ahmedabad : आयपीएल २०२१मध्ये कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरलेल्या पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी ( Punjab Kings) आजही निराश केले. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या ( Royal Challengers Banglore) गोलंदाजांची लोकेश राहुलख्रिस गेल यांची पिसे उपटली, परंतु गेल बाद झाला अन् PBKSच्या फलंदाजांनी तंबूत परतण्याच्या रांगा लावल्या. कर्णधार राहुल एकाबाजून खिंड लढवत होता. पण, त्याला अन्य फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. हरप्रीत ब्रारनं अखेरच्या षटकांत थोडी फार फटकेबाजी करून पंजाब किंग्सला समाधानकारक पल्ला उभारून दिला. IPL 2021 : PK Vs RCB T20 Live Score Update

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्सला सामन्यापूर्वीच धक्का बसला. मयांक अग्रवाल दुखापतीमुळे आजच्या सामन्याला मुकला अन् त्याच्याजागी प्रभसिमरन सिंग ( Prabhsimran Singh) याला संधी देण्यात आली. पण, तोही फार कमाल करू शकला नाही. २०१९च्या लिलावात ४.८ कोटींत खरेदी केलेल्या प्रभसिमरनचा हा आयपीएलमधील दुसराच सामना होता आणि त्यात तो ७ धावांवर बाद झाला. नव्या सहकाऱ्यासह मैदानावर उतरलेल्या लोकेश राहुलनं( KL Rahul)  चांगली सुरूवात केली, परंतु प्रभसिमरन ७ धावांवर माघारी परतला. कायले जेमिन्सनं त्याला बाद केले. पण, जेमिन्सननं टाकलेल्या पाचव्या षटकात ख्रिस गेलनं पाच चौकार खेचले आणि त्यातील चार चौकार हे सलग चेंडूंत आले. गेल व लोकेश यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३२ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी केली.  PBKS Vs RCB, PBKS Vs RCB live score,

ख्रिस गेलचा आक्रमक पवित्रा पाहताना विराटनं एकमागून एक गोलंदाज बदली करून पाहिले, परंतु त्याचा फार उपयोग झाला नाही. युझवेंद्र चहलची अपयशी कामगिरी याही सामन्यात कायम राहिली. त्याच्या दोन षटकांत २८ धावा चोपल्या. विराटनं ११व्या षटकात या सामन्यातील यशस्वी गोलंदाज डॅनिएल सॅम्सला पाचारण केलं अन् त्यानं गेलची विकेट घेतली. गेल २४ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ४६ धावांवर यष्टिरक्षक एबी डिव्हिलियर्सच्या हाती झेल देऊन माघारी परतला. IPL 2021, IPL 2021 latest news, PBKS Vs RCB IPL Matches


लोकेशनं ३५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं, परंतु निकोलस पूरन ( ०) पुन्हा अपयशी ठरला. यंदाच्या आयपीएलमध्ये तो चौथ्यांदा शून्यावर बाद झाला आहे. गेल माघारी परतल्यानंतर पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी तंबूत जाण्याची घाई दाखवली. दीपक हुडा ( ५) व शाहरुख खान ( ०) यांनी निराश केले. चहलनं कमबॅक करताना दुसऱ्या स्पेलमध्ये २ षटकांत ६ धावा देत १ विकेट घेतली.  लोकेश व हरप्रीत ब्रार यांनी सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. लोकेश ५७ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह ९१ धावांवर नाबाद राहिला. ( KL Rahul is now the orange cap holder of IPL 2021) पंजाब किंग्सनं ५ बाद १७९ धावा केल्या. ब्रार २५ धावांवर नाबाद राहिला. त्यानं सहाव्या विकेटसाठी ३२ चेंडूंत ६१ धावांची भागीदारी केली.

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021, PBKS Vs RCB  T20 Live : KL Rahul (91*), Gayle (46) guide Punjab Kings to 179/5 against Royal Challengers Bangalore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app