IPL 2021 MS Dhoni sets new record The first wicketkeeper to do so | IPL 2021: महेंद्रसिंग धोनीने रचला नवा विक्रम; अशी कामगिरी करणारा पहिला यष्टिरक्षक

IPL 2021: महेंद्रसिंग धोनीने रचला नवा विक्रम; अशी कामगिरी करणारा पहिला यष्टिरक्षक

मुंबई : चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने बुधवारी झालेल्या अत्यंत रोमांचक सामन्यात शांत राहताना मोक्याच्यावेळी गोलंदाजांकडून नियंत्रित मारा करवून घेतला आणि कोलकाता नाईट रायडर्सचा कडवा प्रतिकार १८ धावांनी परतावून लावला. या सामन्यात धोनी फलंदाज म्हणून फारशी छाप पाडू शकला नाही, मात्र यष्टिरक्षक म्हणून त्याने मोठा विक्रम केला असून अशी कामगिरी करणारा तो पहिला यष्टिरक्षक ठरला आहे.

आयपीएलचे फॅन आहात? मग सोप्या प्रश्नांची द्या उत्तरं आणि जिंका आकर्षक बक्षिसे

आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा यष्टिरक्षक म्हणून धोनीची ओळख आहे. हा विक्रम अधिक भक्कम करताना धोनीने नवा पराक्रम रचला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही सर्वाधिक यशस्वी यष्टिरक्षकांमध्ये धोनीचा समावेश असून तो तिसऱ्या स्थानी आहे. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज यष्टिरक्षक मार्क बाऊचर सर्वाधिक बळी घेणाºयांमध्ये अव्वल असून त्याने ५९६ आंतरराष्ट्रीय डावांमध्ये ९९८ बळी (९५२ झेल आणि ४६ स्टम्पिंग) घेतले आहेत. दुसºया स्थानावरील ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅडम गिलख्रिस्टने ४८५ डावांमध्ये ९०५ बळी घेताना ८१३ झेल आणि ९२ स्टम्पिंग केले आहेत. धोनी तिसºया स्थानी असून त्याने ६०८ डावांमध्ये ८२९ बळी मिळवताना ६३४ झेल आणि १९५ स्टम्पिंग केले आहेत.

IPL 2021: अरे बापरे! धोनीने पहिल्यांदाच ‘या’ गोलंदाजाला ठोकला चौकार

बुधवारी त्याने कोलकाताविरुद्ध नवा विक्रमाला गवसणी घातली. आयपीएलमध्ये १५० बळी पूर्ण करणारा धोनी पहिला यष्टिरक्षक ठरला आहे. दीपक चहरच्या गोलंदाजीवर कोलकाताचा कर्णधार इयॉन मॉर्गन याचा झेल घेत धोनीने आयपीएलमधील १५०वा बळी घेतला. कोलकाताच्या सामन्याआधी या विक्रमापासून धोनी केवळ २ बळींनी दूर होता. दीपकच्याच गोलंदाजीवर राहुल त्रिपाठीचा झेल घेत धोनीने १४९ वा बळी मिळवला होता. आता धोनीच्या नावावर आयपीएलमध्ये २०८ सामन्यांत एकूण १५१ बळींची नोंद झाली आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणारे यष्टिरक्षक :
१. महेंद्रसिंग धोनी (२०८ सामने) : १५१ बळी (११२ झेल, ३९ स्टम्पिंग)
२. दिनेश कार्तिक (२०० सामने) : १४३ बळी (११२ झेल, ३१ स्टम्पिंग)
३. रॉबिन उथप्पा (१८९ सामने) : ९० बळी (५८ झेल, ३२ स्टम्पिंग)
४. पार्थिव पटेल (१३९ सामने) : ८१ बळी (६५ झेल, १६ स्टम्पिंग)
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021 MS Dhoni sets new record The first wicketkeeper to do so

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.