IPL 2021, KKR vs SRH T20 Live : कोलकाताची युवा ब्रिगेड सॉलिड खेळली; नितीश राणानं ८० पैकी ६० धावा अवघ्या १३ चेंडूंत चोपल्या 

IPL 2021 : KKR vs SRH  T20 Live Score Update : कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) संघाच्या यंग ब्रिगेडसमोर सनरायझर्स हैदराबादच्या ( Sunrisers Hyderabad) गोलंदाजांची धुलाई केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 09:13 PM2021-04-11T21:13:43+5:302021-04-11T21:19:05+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, KKR vs SRH T20 Live :  Nitish Rana & Rahul Tripathi Two half-centurions; KKR have posted 187 for 6 | IPL 2021, KKR vs SRH T20 Live : कोलकाताची युवा ब्रिगेड सॉलिड खेळली; नितीश राणानं ८० पैकी ६० धावा अवघ्या १३ चेंडूंत चोपल्या 

IPL 2021, KKR vs SRH T20 Live : कोलकाताची युवा ब्रिगेड सॉलिड खेळली; नितीश राणानं ८० पैकी ६० धावा अवघ्या १३ चेंडूंत चोपल्या 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021 : KKR vs SRH  T20 Live Score Update : कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) संघाच्या यंग ब्रिगेडसमोर सनरायझर्स हैदराबादच्या ( Sunrisers Hyderabad) गोलंदाजांची धुलाई केली. शुबमन गिल व नितीश राणा ( Nitish Rana) यांनी दमदार सुरूवात करून दिली. त्यानंतर राहुल त्रिपाठीनं ( Rahul Tripathi) हात धुऊन घेतले. नितीश व राहुलनं अर्धशतकी खेळी करताना SRHच्या गोलंदाजांना हतबल केलं. राहुलनं ५३ धावा चोपल्या. नितीशला शतकानं हुलकावणी दिली. नितीशनं ५६ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांसह ८० धावा चोपल्या. हे दोघंही माघारी परतल्यानंतर SRHच्या गोलंदाजांनी कमबॅक केले. पण, दिनेश कार्तिकनं मॅच फिनिशर इनिंग खेळताना ९ चेंडूंत २२ धावा चोपल्या.   अम्पायरनं बाद देऊ नये म्हणून Nitish Rana नं दाखवली बॅट, जाणून घ्या नेमकं काय झालं IPL 2021 : KKR vs SRH T20 Live Score Update

नितीश-शुबमनची सॉलिड सुरूवात
KKR नं नितीश राणा व शुबमन गिल या जोडीला सलामीला उतरवले. राणानं पहिल्या पॉवरप्लेमध्ये फटकेबाजी करताना शुबमन सह ५० धावा चोपल्या. यापैकी ३६ धावा या नितीशच्या होत्या. ही जोडी तोडण्यासाठी SRHनं राशिद खानला पाचारण केलं आणि त्यानं शुबमनला ( १५) बाद करून यश मिळवून दिलं.  ipl 2021 t20 KKR vs SRH live match score updates chennai

नितीश राणाला बाद दिल्याचा निर्णय बदलावा लागला...
डावाच्या ९व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर राशिदच्या गोलंदाजीवर नितीश राणानं रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा हा प्रयत्न फसला. चेंडू पॅडला लागल्यानं राशिदनं LBW ची अपील केली आणि मैदानावरील पंचांनी त्याला बाद दिले. पण, चेंडू पॅडला लागण्यापूर्वी त्याचा बॅटीशी संपर्क आला होता, असे नितीश राणा बॅट दाखवून इशाऱ्यानं सांगत होता. मैदानावरील पंचांनी बाद देताच नितीशनं त्वरीत DRS घेतला आणि तो नाबाद असल्याचा निर्णय तिसऱ्या पंचांनी दिली. KKR vs SRH, KKR vs SRH live score


राणा व राहुल त्रिपाठी यांनी SRHच्या गोलंदाजांची धुलाई
शुबमन माघारी परतल्यानंतर नितीश राणानं राहुल त्रिपाठीसह दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. राहुलनं आयपीएलमध्ये १००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला. नितीशनं पहिल्या ते पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम केला. आयपीएलमध्ये रोहित शर्मा व शेन वॉटसन यांना अशी कामगिरी करता आली आहे. राहुल त्रिपाठीनेही २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. पण, पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. त्यानं २९ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५३ धावा केल्या. नितीश व राहुल यांची ५० चेंडूंत ९० धावांची भागीदारी टी नटराजननं तोडली. त्यानंतर SRHच्या गोलंदाजांनी सामन्यात कमबॅक केले. मोहम्मद नबीनं सलग दोन चेंडूंत दोन विकेट्स घेत नितीश व इयॉन मॉर्गन यांना माघारी पाठवले. KKRला २० षटकांत ६ बाद १८७ धावांवर समाधान मानावे लागले. शिखर धवनला बाद करण्यासाठी MS Dhoni चा 'मून' बॉलवर स्टम्पिंगचा प्रयत्न, Video 

Web Title: IPL 2021, KKR vs SRH T20 Live :  Nitish Rana & Rahul Tripathi Two half-centurions; KKR have posted 187 for 6

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.