IPL 2021, KKR vs DC Qualifier 2 Live Updates : दिल्लीच्या ताफ्यात महत्त्वाचा खेळाडू परतला, कोलकातानं आंद्रे रसेलला बाकावरच बसवला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 07:06 PM2021-10-13T19:06:53+5:302021-10-13T19:07:16+5:30

IPL 2021, Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Qualifier 2 Live Updates : दिल्ली कॅपिटल्स ( DC) व कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) यांच्यापैकी आयपीएल २०२१च्या अंतिम सामन्यात कोणता संघ दाखल होईल, याचा फैसला आज होणार आहे.

IPL 2021, KKR vs DC Qualifier 2 Live Updates : KKR won the toss and decided to bowl first, marcus Stoinis replaces Tom Curran in Delhi Capitals | IPL 2021, KKR vs DC Qualifier 2 Live Updates : दिल्लीच्या ताफ्यात महत्त्वाचा खेळाडू परतला, कोलकातानं आंद्रे रसेलला बाकावरच बसवला

IPL 2021, KKR vs DC Qualifier 2 Live Updates : दिल्लीच्या ताफ्यात महत्त्वाचा खेळाडू परतला, कोलकातानं आंद्रे रसेलला बाकावरच बसवला

Next

IPL 2021, Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Qualifier 2 Live Updates : दिल्ली कॅपिटल्स ( DC) व कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) यांच्यापैकी आयपीएल २०२१च्या अंतिम सामन्यात कोणता संघ दाखल होईल, याचा फैसला आज होणार आहे. दिल्लीला क्वालिफायर १मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून ( CSK) हार मानावी लागली, तर KKRनं एलिमिनेटरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे ( RCB) आव्हान सहज परतवून लावताना क्वालिफायर २ मध्ये स्थान पक्के केले. त्यामुळे आज कोण बाजी मारतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोलकातानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आजही आंद्रे रसेलला बाकावर बसवणं महत्त्वाचं समजलं. दिल्लीनं संघात एक बदल करताना टॉम कुरनच्या जागी मार्कस स्टॉयनिसला संधी दिलीय.


दिल्ली संघ स्पर्धेत सर्वात संतुलित संघांपैकी एक असून, त्यांच्याकडे भक्कम फलंदाजी आणि भेदक गोलंदाजी आहे. दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनकडून भरीव मदत होते. शिखर धवन, पृथ्वी शॉ आणि श्रेयस अय्यर  यांच्यासह पंत व शिमरोन हेटमायर हे धावा काढण्यात तरबेज आहेत. धवनने यंदा ५५१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग कोच बनल्यापासून संघ बलाढ्य झाला आहे. २०१९ ला दिल्लीने तिसरे व मागच्या सत्रात दुसरे स्थान पटकविले होते. यंदा एक पाऊल पुढे टाकून जेतेपदाची माळ गळ्यात टाकून घेण्यास खेळाडू इच्छुक असतील.

इयॉन मॉर्गनच्या संघाने यूएईत सर्वच सामन्यात प्रभावी कामगिरी केली. आरसीबीला नमविणारी कामगिरी पाहिल्यास केकेआरला नमविणे दिल्लीसाठी सोपे नाही. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरीन ही जोडी दिल्लीसाठी डोकेदुखी ठरू शकेल.  शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर आणि राहुल त्रिपाठी यांनी यंदा धावा काढल्या, पण केकेआरला फायनलची दारे उघडी करायची झाल्यास कर्णधार मॉर्गनकडून मोठी खेळी अपेक्षित आहे.  

कोलकाता नाइट रायडर्स - शुबमन गिल, वेंकटेश अय्यर, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, शाकिब अल हसन, इयॉन मॉर्गन, दिनेश कार्तिक, सुनील नरीन, ल्युकी फर्ग्युसन, शिवम मावी, वरुण चक्रवर्थी. ( KKR: 1 Shubman Gill, 2 Venkatesh Iyer, 3 Rahul Tripathi, 4 Nitish Rana, 5 Dinesh Karthik (wk), 6 Eoin Morgan (capt), 7 Shakib Al Hasan, 8 Sunil Narine, 9 Lockie Ferguson, 10 Varun Chakravarthy, 11 Shivam Mavi)

दिल्ली कॅपिटल्स - पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, शिमरोन हेटमायर, मार्कस स्टॉयनिस, अक्षर पटेल, आर अश्विन, कागिसो रबाडा, अॅनरिच नॉर्ट्जे, आवेश खान. ( D. Capitals: 1 Prithvi Shaw, 2 Shikhar Dhawan, 3 Shreyas Iyer, 4 Rishabh Pant (capt & wk), 5 Shimron Hetmyer, 6 Marcus Stoinis, 7 Axar Patel, 8 R Ashwin, 9 Kagiso Rabada, 10 Anrich Nortje, 11 Avesh Khan) 
 

English summary :
IPL 2021, KKR vs DC Qualifier 2 Live Updates : KKR won the toss and decided to bowl first, marcus Stoinis replaces Tom Curran in Delhi Capitals

Web Title: IPL 2021, KKR vs DC Qualifier 2 Live Updates : KKR won the toss and decided to bowl first, marcus Stoinis replaces Tom Curran in Delhi Capitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app