IPL 2021 : रशिद खानने विकेट घेतला आणि तिने एकच जल्लोष केला, SRH-KKR सामन्यानंतर मिस्ट्री गर्ल चर्चेत 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 11:19 AM2021-04-12T11:19:16+5:302021-04-12T11:21:09+5:30

IPL 2021, KKR vs SRH : सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईटरायडर्स यांच्यात झालेल्या लढतीत हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र या लढतीत सनरायझर्सच्या चाहत्यांना काही क्षणी जल्लोष करण्याचीही संधी मिळाली.

IPL 2021: Kaviya Maran cheers when Rashid Khan Rashid Khan took the wicket in SRH-KKR match | IPL 2021 : रशिद खानने विकेट घेतला आणि तिने एकच जल्लोष केला, SRH-KKR सामन्यानंतर मिस्ट्री गर्ल चर्चेत 

IPL 2021 : रशिद खानने विकेट घेतला आणि तिने एकच जल्लोष केला, SRH-KKR सामन्यानंतर मिस्ट्री गर्ल चर्चेत 

Next

चेन्नई - सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईटरायडर्स यांच्यात झालेल्या लढतीत हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र या लढतीत सनरायझर्सच्या चाहत्यांना काही क्षणी जल्लोष करण्याचीही संधी मिळाली. हैदराबादचा फिरकीपटू रशिद खान याने कोलकात्याची फलंदाजी सुरू असताना भेदक मारा करत दोन बळी टिपले. दरम्यान, रशिद खानने बळी मिळवल्यावर जोरदार जल्लोष करणाची एक मिस्ट्री गर्ल चर्चेत आली आहे. ती तरुणी कोण याची चर्चा सध्या सुरू आहे. (Kaviya Maran cheers when Rashid Khan Rashid Khan took the wicket in SRH-KKR match )

कोलकात्याची फलंदाजी सुरू असताना रशिद खानने शुभमन गिलचा त्रिफळा ऊडवत त्याला डगआऊटची वाट दाखवली होती. रशिदने शुभमनची विकेट काढल्यावर मैदानात उपस्थित असलेल्या सनरायझर्सच्या मोजक्या पाठिराख्यांपैकी एका तरुणीने जोरदार जल्लोष केला. तिचा जल्लोष लाइव्ह प्रक्षेपणादरम्यानही दिसून आला. या तरुणीची ओळख आता समोर आली आहे. या तरुणीचे नाव काव्या मारन असून, ती सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीची सीईओ आहे. आयपीएल २०२१ च्या लिलावामध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी बोली लावताना दिसून आली होती.  

काव्या मारन क्रिकेटप्रेमी असून, ती आपला व्यवसायही चांगल्याप्रकारे सांभाळते. काव्या आयपीएलमध्ये पहिल्यांदा २०१८ मध्ये दिसून आली होती. तिने चेन्नईमध्ये एमबीए केले होते. आता तिने आपले संपूर्ण लक्ष आयपीएलवर केंद्रित केले आहे.  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021: Kaviya Maran cheers when Rashid Khan Rashid Khan took the wicket in SRH-KKR match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app