IPL 2021: Did Nicholas Pooran open a jewelery shop? | IPL 2021 : निकोलस पूरनने ज्वेलरी शॉप उघडलीय की काय? 

IPL 2021 : निकोलस पूरनने ज्वेलरी शॉप उघडलीय की काय? 

-ललित झांबरे

वेस्ट इंडिजचा  निकोलस पूरन (Nicholas Pooran)  हा फटकेबाजीसाठी प्रसिध्द असल्याने टी-20 (T20)  क्रिकेटसाठी योग्य फलंदाज मानला जातो. पंजाब किंग्जने (PBKS). झटपट धावा करण्यासाठीच त्याला आपल्या संघात घेतलेय पण यंदा त्याला जणू ग्रहणच लागले आहे. यंदा चार सामन्यात आतापर्यंत तो फक्त नऊ धावाच करु शकला आहे आणि तीन डावात शून्यावर बाद झाला आहे. आणि त्याचे हे शून्यावर बाद होणेसुध्दा अगदी वेगळे आणि एकदम खास आहे. (Did Nicholas Pooran open a jewelery shop?)

या गड्याने शून्यावर बाद होतानासुध्दा एकही चेंडू न खेळता, पहिल्याच चेंडूवर, दुसऱ्या चेंडूवर आणि तिसऱ्या चेंडूवर बाद होण्याचा अद्वितीय पराक्रम केला आहे आणि क्रिकेटप्रेमींना माहितच आहे की क्रिकेटच्या भाषेत कोणताही चेंडू न खेळता बाद होण्याला 'डायमंड डक' (Diamond Duck) म्हणतात. पहिल्याच चेंडूवर बाद होण्याला 'गोल्डन डक' (Golden Duck), दुसऱ्या चेंडूवरील भोपळ्याला 'सिल्व्हर डक'  (Silver Duck) आणि तिसऱ्या चेंडूवर बाद होण्याला 'ब्राँझ डक' (Bronze Duck) म्हणतात.  

याप्रकारे निकोलस पूरनने ब्राँझ, सिल्व्हर, गोल्डन आणि डायमंड डक मिळवले आहेत आणि म्हणूनच क्रिकेटप्रेमी गमतीने म्हणताहेत की, निकोलस पूरनने ज्वेलरी शॉप उघडलीय की काय? आणि या काॕमेंटची जोरदार चर्चा आहे. 

यंदा निकोलस बुधवारी सनरायझर्सविरुध्दच्या सामन्यात एकही चेंडू न खेळताच धावबाद झाला याप्रकारे त्याने डायमंड डक मिळवला. राजस्थान राॕयल्सविरुध्द तो पहिल्याच चेंडूवर परतला होता. त्या सामन्यात त्याला 'गोल्डन डक'  मिळाला. सीएसकेविरुध्द तो दुसऱ्या चेंडूवर बाद झाला पण शून्य कायम राहिले याप्रकारे त्याने 'सिल्व्हर डक' सुध्दा मिळवला. गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये तो दिल्ली कॕपिटल्सविरुध्द तिसऱ्या चेंडूवर पण शून्यावरच बाद झाला होता. याप्रकारे 'ब्राँझ डक'सुध्दा त्याने मिळवला. 

याप्रकारे निकोलस पुरनने ज्वेलरी शाॕप उघडण्यासाठी आवश्यक असलेले सर्व- डायमंड, गोल्डन, सिल्व्हर आणि ब्राँझ 'डक' त्याने मिळवले आहेत, म्हणून तो आता ज्वेलरी शाॕप उघडू शकतो अशी गमतीशीर चर्चा सुरु आहे.
 

English summary :
Did Nicholas Pooran open a jewelery shop?

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021: Did Nicholas Pooran open a jewelery shop?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.