IPL 2021 : DC Vs SRH T20 Live : केन विलियम्सची एकाकी झुंज; DS vs SRH सामन्यात रंगणार सुपर ओव्हरचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 11:23 PM2021-04-25T23:23:17+5:302021-04-25T23:25:11+5:30

ipl 2021  t20 DC Vs SRH live match score updates Chennai : सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघाची गाडी रुळावर आली असे वाटत असताना दिल्ली कॅपिटल्सनं ( Delhi Capitals) त्यांना जवळपास धक्का दिला होता. पण..

IPL 2021 : DC Vs SRH T20 Live Score: Great knock from Kane Williamson, FIRST SUPER OVER OF IPL 2021 | IPL 2021 : DC Vs SRH T20 Live : केन विलियम्सची एकाकी झुंज; DS vs SRH सामन्यात रंगणार सुपर ओव्हरचा थरार

IPL 2021 : DC Vs SRH T20 Live : केन विलियम्सची एकाकी झुंज; DS vs SRH सामन्यात रंगणार सुपर ओव्हरचा थरार

Next

ipl 2021  t20 DC Vs SRH live match score updates Chennai : सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघाची गाडी रुळावर आली असे वाटत असताना दिल्ली कॅपिटल्सनं ( Delhi Capitals) त्यांना जवळपास धक्का दिला होता. पुन्हा एकदा SRHच्या फलंदाजांना नराज केलं. केन विलियम्सन एकटा खिंड लढवताना दिसला अन् दुसऱ्या बाजूनं SRHचे एकेक फलंदाज तंबूत परतत होते. डेव्हिड वॉर्नर, केदार जाधव यांनी आपापल्या विकेट्स फेकल्या. पण, केन अखेरपर्यंत खिंड लढवत राहिला अन् सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.  सनरायझर्स हैदराबादला ७ बाद १५९ धावा करता आल्या. IPL 2021 : DC Vs SRH T20 Live Score Update

दिल्ली कॅपिटल्सनं ( Delhi Capitals) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉ व शिखर धवन यांनी पहिल्या विकेटसाठी ८१ धावा जोडताना सनरायझर्स हैदराबादच्या ( Sunrisers Hyderabad) गोलंदाजांची धुलाई केली. राशिद खाननं SRHला पहिलं यश मिळवून दिलं अन् धवन २६ चेंडूंत ३ चौकारांसह २८ धावांवर माघारी परतला. पृथ्वी आज तुफान फॉर्मात दिसत होता, परंतु कर्णधार रिषभ पंत व त्याच्यातील ताळमेळ चुकला. पृथ्वीला ३९ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ५३ धावांवर धावबाद होऊन माघारी परतावले लागले. ८४ धावांवर DCचे दोनही सलामीवर बाद झाले. DC Vs SRH, DC Vs SRH live score, IPL 2021


रिषभ पंत व स्टीव्ह स्मिथ यांनी संयमी खेळ करताना दिल्ली कॅपिटल्सचा धावफलक हलता ठेवला. त्यांना नशीबाची साथही मिळाली. SRHच्या क्षेत्ररक्षकांनी त्यांचे सोपे झेल टाकले. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.  रिषभनं २७ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३७ धावा केल्या. त्याच षटकात निकोलस पूरन ( १) माघारी परतला. स्मिथ  २६ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ३४ धावांवर नाबाद राहिला. दिल्लीनं ४ बाद १५९ धावा केल्या. DC Vs SRH IPL Matches, DC Vs SRH IPL match 2021


प्रत्युत्तरात जॉनी बेअरस्टोनं फटकेबाजी करून चांगली सुरुवात करून दिली, पण डेव्हिड वॉर्नरला घाई नडली. चौथ्या षटकात तो ( ६) धावबाद झाला. बेअरस्टो व केन विलियम्सन यांनी संयमी खेळ करताना SRHचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु आवेश खाननं ही जोडी तोडली. बेअरस्टो १८ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ३८ धावा करून माघारी परतला. विराट सिंगला आज मोठी खेळी करण्याची संधी होती, परंतु मार्कस स्टॉयनिसनं त्याचा ( ४) सुरेख झेल टिपला. केदार जाधवनं ( ९) अमित मिश्राच्या गोलंदाजीवर विकेट फेकली. केननं आयपीएलमधील १६ वे अर्धशतक पूर्ण करताना RHच्या आशा जीवंत राखल्या होत्या. IPL 2021 latest news, DC Vs SRH IPL Matches

 अक्षर पटेलनं १७व्या षटकात सलग दोन चेंडूंवर हैदराबादला धक्के दिले आणि त्यामुळे विलियम्सनवरील दडपण वाढले. कोरोनावर मात करून पहिल्यांदा मैदानावर उतरलेल्या अक्षरनं ४ षटकांत २६ धावांत २ विकेट्स घेतल्या. १९व्या षटकात आवेशनं विजय शंकरला ( ८) बाद केले. अखेरच्या षटकात १६ धावांची गरज असताना केन व जगदीशन सुचिथ यांनी कागिसो रबाडाला चोपून काढले. केन ५१ चेंडूंत ८ चौकारांसह ६६ धावांवर नाबाद राहिला. १ चेंडूंत २ धावांची गरज असताना सुचिथ स्ट्राईकवर होता. अन् त्याला एकच धाव काढता आली सामना सुपर ओव्हरमध्ये रंगला. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021 : DC Vs SRH T20 Live Score: Great knock from Kane Williamson, FIRST SUPER OVER OF IPL 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app