IPL 2021, DC vs RR Live Updates : कार्तिक त्यागीनं टाकलेल्या चेंडूवर गब्बरचा अंदाज चुकला अन् विचित्र पद्धतीनं बाद झाला, Video 

IPL 2021, Delhi Capitals Vs Rajasthan Royals Live Updates : युवा खेळाडूंची फौज घेऊन मैदानावर उतरलेल्या राजस्थान रॉयल्स संघानं ( Rajasthan Royals) नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 04:00 PM2021-09-25T16:00:53+5:302021-09-25T16:01:58+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, DC vs RR Live Updates : Kartik Tyagi gets the leading run-scorer Shikhar Dhawan in his first ball of the spell, Video  | IPL 2021, DC vs RR Live Updates : कार्तिक त्यागीनं टाकलेल्या चेंडूवर गब्बरचा अंदाज चुकला अन् विचित्र पद्धतीनं बाद झाला, Video 

IPL 2021, DC vs RR Live Updates : कार्तिक त्यागीनं टाकलेल्या चेंडूवर गब्बरचा अंदाज चुकला अन् विचित्र पद्धतीनं बाद झाला, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, Delhi Capitals Vs Rajasthan Royals Live Updates : युवा खेळाडूंची फौज घेऊन मैदानावर उतरलेल्या राजस्थान रॉयल्स संघानं ( Rajasthan Royals) नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यांच्या गोलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) सलामीवीरांना पॉवर प्लेमध्ये माघारी पाठवून मोठा धक्का दिला. आयपीएल २०२१ ( IPL 2021) मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या शिखर धवनची ( Shikhar Dhawan) विकेट चर्चेचा विषय ठरत आहे. युवा गोलंदाजा कार्तिक त्यागी ( Kartik Tyagi) याच्या स्पेलच्या पहिल्याच चेंडूवर गब्बर दुर्दैवीरित्या बाद झाला. त्यानंतर चेतन सकारियानं DCचा दुसरा सलामीवीर पृथ्वी शॉची विकेट घेतली. दिल्लीला २१ धावांवर हे दोन धक्के बसले. 

रोहित शर्मा रविवारच्या सामन्यात विराट कोहलीची कोंडी करणार; तगडा खेळाडू मैदानावर उतरवणार!

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातल्या सामन्यातील निकालानंतर प्ले ऑफसाठीची चुरस अधिक रंजक होईल. DCने बाजी मारली तर आयपीएल २०२१मध्ये प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचा पहिला मान ते पटकावतील, पण RRने विजय मिळवल्यास ते टॉप फोअरमध्ये प्रवेश करतील. RRच्या टॉप फोअर एन्ट्रीमुळे मुंबई इंडियन्स ( MI) व कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) यांच्यासमोरील अडचण वाढणार आहे. आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलमध्ये २३ सामने झाले आहेत. त्यापैकी ११ सामने दिल्लीनं, तर १२ सामने राजस्थाननं जिंकले आहेत. 

पाहा विकेट


 
दिल्ली कॅपिटल्सचा संघ - पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, ललित यादव, शिमरोन हेटमायर, अक्षर पटेल, आर अश्विन, कागिसो रबाडा, अॅनरिच नॉर्ट्जे, आवेश खान ( #DelhiCapitals (Playing XI): Prithvi Shaw, Shikhar Dhawan, Shreyas Iyer, Rishabh Pant (w/c), Lalit Yadav, Shimron Hetmyer, Akshar Patel, Ravichandran Ashwin, Kagiso Rabada, Anrich Nortje, Avesh Khan.)

राजस्थान रॉयल्सचा संघ - यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, लायम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मिलर, महिपाल लोमरोर, रियान पराग, राहुल टेवाटिया, कार्तिक त्यागी, चेतन सकारीया, मुस्ताफिजूर रहमान, तब्रेज शम्सी. ( #RR (Playing XI): Yashasvi Jaiswal, Sanju Samson (w/c), Liam Livingstone, David Miller, Mahipal Lomror, Riyan Parag, Rahul Tewatia, Kartik Tyagi, Chetan Sakariya, Mustafizur Rahman, Tabraiz Shamsi.) 

Web Title: IPL 2021, DC vs RR Live Updates : Kartik Tyagi gets the leading run-scorer Shikhar Dhawan in his first ball of the spell, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.