ipl 2021 t20 CSK vs RR live match score updates Mumbai : फलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) गोलंदाजांनीही दमदार खेळ केला. कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) त्याच्या फिरकी गोलंदाजांचा सुरेख वापर करताना राजस्थान रॉयल्सचा ( Rajastan Royals) पराभव निश्चित केला. रवींद्र जडेजानं ( Ravindra Jadeja) एकाच षटकात RRचे दोन सेट फलंदाज माघारी पाठवून सामन्याला कलाटणी दिली. त्यानंतर मोईन अलीनं ( Moeen Ali) दोन षटकांत तीन विकेट्स घेत सामना पूर्णतः CSKच्या बाजूनं झुकवला. चेन्नईनं हा सामना जिंकूण गुणतक्त्यात आगेकूच केली.  IPL 2021 : CSK vs RR T20 Live Score Update

रवींद्र जडेजानं सामना फिरवला...
जोस बटलर व मनन वोहरा यांनी RRला चांगली सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी २३ चेंडूंत ३० धावा जोडल्या, परंतु सॅम कुरननं वोहराला ( १४) माघारी जाण्यास भाग पाडले. संजू सॅमसनला (१) कुरननं माघारी जाण्यास भाग पाडले. पहिल्या पॉवर प्लेमध्ये CSKनं २ बाद ४५ धावा केल्या होत्या. त्यानंतर आलेल्या शिवम दुबेनं घरच्या मैदानावर CSKचा पाहुणचार घेतला. ४२ धावांची ही भागीदारी रवींद्र जडेजानं तोडली. जोस बटलर ३५ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४९ धावांवर त्रिफळाचीत झाला. त्याच षटकात जडेजानं RRचा सेट फलंदाज दुबेलाही ( १७) पायचीत करून माघारी पाठवले. IPL 2021 latest news, CSK vs RR IPL Matches

विजयासाठी ४८ चेंडूत ९९ धावा...
४८ चेंडूंत ९९ धावांची गरज असताना RRला कमबॅक करणं तितकं सोप नव्हतं. धोनीनं लगेच मोईन अलीला पाचारण केलं अन् त्यानं डेव्हिड मिलरला पायचीत करून हा निर्णय योग्य ठरवला. DRS घेतला असता तर कदाचित मिलर नाबाद ठरला असता. निम्मा संघ माघारी पाठवल्यानंतर धोनीनं आक्रमक क्षेत्ररक्षण लावून RRच्या फलंदाजांवर दडपण निर्माण केले. १५व्या षटकात मोईन अलीनं आणखी दोन धक्के देत CSKचा विजय पक्का केला. सॅम कुरननं २४ धावांत २, रवींद्र जडेजानं २८ धावांत २, तर मोईन अलीनं ७ धावांत ३ विकेट्स घेतल्या.राजस्थान रॉयल्सला २० षटकांत ९ बाद १४३ धावाच करता आल्या आणि चेन्नईनं हा सामना ४५ धावांनी जिंकला. IPL 2021 CSK vs RR, CSK vs RR Live Match  वानखेडे स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करूनही चेन्नईनं मिळवलेला हा पहिलाच विजय ठरला. ( This is the first time in their history that CSK have won when batting first at the Wankhede Stadium) 

फॅफ ड्यू प्लेसिस, मोईन अली, रायुडू, रैना चमकले...
चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) फलंदाजांनी वैयक्तिक कामगिरी उंचावली, परंतु त्यांना मोठी भागीदारी करता आली नाही. फॅफ ड्यू प्लेसिल, मोईन अली, अंबाती रायुडू व सुरेश रैना यांनी CSKसाठी मजबूत पाया उभारून दिला. राजस्थान रॉयल्सच्या ( Rajasthan Royals) गोलंदाजांनीही चांगले कमबॅक केले. महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) व रवींद्र जडेजा यांच्याकडे ६ षटकं खेळण्यासाठी असतानाही त्यांना समाधानकारक धावा करता आल्या नाहीत. या दोघांनी २१ चेंडूंत २२ धावांची भागीदारी केली. फ्रंटसीटवर बसलेली CSK अखेरच्या सहा षटकांत RRनं बॅकसीटवर फेकले. चेतन सकारियानं तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. फॅफ १७ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३३ धावा कुटल्या.  अलीनं २० चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह २६ धावा केल्या. IPL 2021 CSK vs RR Live T20 Score 


धोनी-जडेजानं केलं निराश, चेतन सकारिया चमकला...
३ बाद ७८ अशा अवस्थेत असताना CSKच्या ताफ्यातील सर्वात अनुभवी फलंदाज अंबाती रायुडू व सुरेश रैना खेळपट्टीवर फटकेबाजी करताना दिसले. रायुडूनं १७ चेंडूंत ३ षटकारांसह २७ धावा चोपताना चौथ्या विकेटसाठी रैनासह २६ चेंडूंत ४५ धावा जोडल्या. सुरेश रैनाला १८ धावांवर माघारी जाण्यास भाग पाडले. चेन्नईनं १४ षटकांत ५ बाद १२५ धावा केल्या होत्या. कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) व रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) ही जोडी खेळपट्टीवर असल्यानं RRच्या ताफ्यात धाकधुक होती. पण, RRच्या गोलंदाजांचे कौतुक करायला हवं. धोनी १७ चेंडूंत १८ धावांत माघारी परतला. युवा गोलंदाज चेतननं ३६ धावांत ३ विकेट्स घेतल्या.  ड्वेन ब्राव्होनं ८ चेंडूंत नाबाद २० ( २ चौकार व १ षटकार) धावा करून चेन्नईला ९ बाद १८८ धावांचा समाधानकारक पल्ला गाठून दिला.  ipl 2021  t20 CSK vs RR live match score updates  Mumbai

English summary :
This is the first time in their history that CSK have won when batting first at the Wankhede Stadium

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021, CSK vs RR  T20 Live Score Update : Chennai Super Kings beat Rajasthan Royals by 45 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.