IPL 2021, CSK vs RCB Live : चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर सामना विलंबानं सुरू होणार, घडली मोठी घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 07:17 PM2021-09-24T19:17:08+5:302021-09-24T19:18:11+5:30

Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live : चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध झालेल्या २७ सामन्यांत RCBला फक्त ९ वेळा विजय मिळवता आला आहे, तर CSK नं १७ सामने जिंकलेत. १ सामना अनिर्णीत राहिलाय.

IPL 2021, CSK vs RCB Live Updates: Sandstorm in Sharjah, RCBvCSK toss delayed, Next inspection at 07.25 PM IST. | IPL 2021, CSK vs RCB Live : चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर सामना विलंबानं सुरू होणार, घडली मोठी घटना 

IPL 2021, CSK vs RCB Live : चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर सामना विलंबानं सुरू होणार, घडली मोठी घटना 

Next

Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live : स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( Royal Challengers Bangalore ) संघाला मागील लढतीतील पराभव विसरून आयपीएलमध्ये ( IPL 2021) आज चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध ( Chennai Super Kings) होणाऱ्या सामन्यात विजयी पथावर येण्याचे कडवे आव्हान असेल. गुणतक्त्यात CSK १२ गुणांसह दुसऱ्या, तर RCB १० गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध झालेल्या २७ सामन्यांत RCBला फक्त ९ वेळा विजय मिळवता आला आहे, तर CSK नं १७ सामने जिंकलेत. १ सामना अनिर्णीत राहिलाय.


आरसीबीला गुणतालिकेत पहिल्या चार संघांत स्थान मिळवायचे झाल्यास त्यांच्या फलंदाजांना चांगला खेळ करावाच लागेल. देवदत्त पडिक्कल आणि विराट कोहली या सलामीवीरांकडून चांगली सुरुवात अपेक्षित आहे. मधल्या फळीकडूनही संघाला मदत मिळताना दिसत नाही. KKRविरुद्ध त्यांची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स यांना लौकिकानुसार फटकेबाजी करावी लागेल. गोलंदाज KKRविरुद्ध फारसे प्रभावी ठरले नव्हते. 

दुसरीकडे CSKचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडने मुंबईविरुद्ध ५८ चेंडूत शानदार ८८ धावा ठोकल्या. फॅफ ड्यू प्लेसिस आणि मोईन अली यांना खाते उघडण्यात अपयश आले तर अंबाती रायडू जखमी होऊन परतला होता. अनुभवी धोनी आणि सुरेश रैना अपयशी ठरताच ४ बाद २४ अशा स्थितीतून ऋतुराजने रवींद्र जडेजा आणि ब्राव्हो यांच्या सोबतीने संघाला संकटातून बाहेर काढले.  
शाहजाह येथे वादळ आल्यामुळे नाणेफेक १० मिनिटे उशीरानं करावी लागेल असे वाटले होते, परंतु वादळ काही केल्या थांबत नाही. त्यामुळे आता ७.२५ वाजता खेळपट्टीची पाहणी केली जाईल. 

Web Title: IPL 2021, CSK vs RCB Live Updates: Sandstorm in Sharjah, RCBvCSK toss delayed, Next inspection at 07.25 PM IST.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app