IPL 2021 : CSK vs PBKS T20 Live Score Update : आयपीएलच्या १४व्या पर्वात पहिल्याच सामन्यात द्विशतक झळकावणाऱ्या पंजाब किंग्सच्या ( Punjab Kings) तगड्या फलंदाजांनी शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) दीपक चहर ( Deepak Chahar) याच्यासमोर शरणागती पत्करली. रवींद्र जडेजानं ( Ravindra Jadeja) नेहमीप्रमाणे क्षेत्ररक्षणात आपली कमाल दाखवताना PBKSचा कर्णधार लोकेश राहुलला ( KL Rahul) धावबाद केलं अन् युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचाही अफलातून झेल टिपला. महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) पहिल्या ७ षटकांत चहरकडून चार षटकं फेकून घेतली आणि त्याचा फायदा झाला. पंजाबचा निम्मा संघ पहिल्या सात षटकांत माघारी परतला. PBKSच्या शाहरुख खाननं ( Shahrukh Khan) एकट्यानं कडवी झुंज दिली. IPL 2021 : CSK vs PBKS T20 Live Score Update

पहिल्या षटकापासून रंगला थरार...
तगड्या फलंदाजांची फौज असलेल्या PBKSची अवस्था पहिल्या पाच षटकांत CSKनं वाईट केली. दीपक चहरनं ( Deepak Chahar) पहिल्या षटकापासून कहर करण्यास सुरुवात केली. त्याला सर रवींद्र जडेजाची क्षेत्ररक्षणात उत्तम साथ मिळाली. जडेजानं अफलातून रन आऊटही केला अन् पंजाबच्या मोठ्या खेळाडूचा सुरेख झेलही टीपला. ipl 2021  t20 CSK vs PBKS live match score updates  Mumbai 


दीपक चहरच्या चार षटकांनी पंजाब किंग्सचं कंबरडं मोडलं...
महेंद्रसिंग धोनीनं नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला आहे. दीपक चहरनं पहिल्याच षटकात पंजाब किंग्सचा सलामीवीर मयांक अग्रवाल ( 0) याला माघारी पाठवले. त्याच षटकात ऋतुराज गायकवाडनं अखेरच्या चेंडूवर ख्रिस गेलचा ( ०.६ चेंडूवर) सोपा झेल सोडला. लोकेश राहुल व गेल ही जोडी आज वानखेडे दणाणून सोडतील असे वाटले होते, परंतु तिसऱ्या षटकात चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न फसला अन् जडेजाच्या डायरेक्ट हिटनं राहुलला ( ५) धावबाद केले. आयपीएलमध्ये सर्वाधिक २१ धावबाद करण्याचा महेंद्रसिंग धोनीचा विक्रम जडेजानं ( २२) आज मोडला. IPL 2021 : CSK vs PBKS T20 Live Score Update

 झाय रिचर्डसन- शाहरुख खान यांचा संघर्ष...
पाचव्या षटकात चहरनं पंजाबला दोन धक्के दिले. त्यानं ख्रिस गेलला ( १०) व निकोलस पूरन ( ९) यांना बाद केले. रवींद्र जडेजानं हवेत झेपावत गेलचा सुरेख झेल टिपला. दीपक चहरनं ४ षटकांत १३ धावांत ४ विकेट्स घेतल्या आणि त्यात १ निर्धाव षटकही टाकलं. २६ धावांवर पाच फलंदाज माघारी परतल्यानंतर पंजाब किंग्ससाठी झाय रिचर्डसन व शाहरुख खान यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ३१ धावा जोडल्या. पण, मोईन अलीनं त्याच्या पहिल्याच षटकात रिचर्डसनचा ( १५) त्रिफळा उडवला. शाहरुख अखेरपर्यंत खिंड लढवत राहिला. त्यानं ३६ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४७ धावा केल्या. पंजाबला २० षटकांत ८ बाद १०६ धावांवर समाधान मानावे लागले.   IPL 2021, IPL 2021 latest news, CSK vs PBKS IPL Matches ( Shahrukh Khan misses out on a maiden 50 by three runs as he is caught at deep midwicket for 47 off 36 balls.) 

English summary :
Deepak Chahar stunned Punjab with the ball, Jadeja stellar in the field - CSK need just 107 to win

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021, CSK vs PBKS T20 Live: Deepak Chahar stunned Punjab with the ball, Jadeja stellar in the field - CSK need just 107 to win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.