IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : Deepak Chahar 4-13 in 4 overs; brillient Run out & catch from Ravindra Jadeja, Video | IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : दीपक चहरचा 'कहर, पंजाबचा निम्मा संघ माघारी; रवींद्र जडेजा बनला 'सुपर मॅन', Watch Video

IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : दीपक चहरचा 'कहर, पंजाबचा निम्मा संघ माघारी; रवींद्र जडेजा बनला 'सुपर मॅन', Watch Video

IPL 2021 : CSK vs PBKS T20 Live Score Update : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली ( MS Dhoni)  चेन्नई सुपर किंग्सचा संघ ( Chennai Super Kings) आज पंजाब किंग्सचा ( Punjab Kings) सामना करण्यासाठी मैदानावर उतरले आहेत. पण, तगड्या फलंदाजांची फौज असलेल्या PBKSची अवस्था पहिल्या पाच षटकांत CSKनं वाईट केली. दीपक चहरनं ( Deepak Chahar) पहिल्या षटकापासून कहर करण्यास सुरुवात केली. त्याला सर रवींद्र जडेजाची क्षेत्ररक्षणात उत्तम साथ मिळाली. जडेजानं अफलातून रन आऊटही केला अन् पंजाबच्या मोठ्या खेळाडूचा सुरेख झेलही टीपला. IPL 2021 : CSK vs PBKS T20 Live Score Update

महेंद्रसिंग धोनीनं नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला आहे. दीपक चहरनं पहिल्याच षटकात पंजाब किंग्सचा सलामीवीर मयांक अग्रवाल ( 0) याला माघारी पाठवले. त्याच षटकात ऋतुराज गायकवाडनं अखेरच्या चेंडूवर ख्रिस गेलचा ( ०.६ चेंडूवर) सोपा झेल सोडला. लोकेश राहुल व गेल ही जोडी आज वानखेडे दणाणून सोडतील असे वाटले होते, परंतु तिसऱ्या षटकात चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न फसला अन् जडेजाच्या डायरेक्ट हिटनं राहुलला ( ५) धावबाद केले. पाचव्या षटकात चहरनं पंजाबला दोन धक्के दिले. त्यानं ख्रिस गेलला ( १०) व निकोलस पूरन ( ९) यांना बाद केले. रवींद्र जडेजानं हवेत झेपावत गेलचा सुरेख झेल टिपला. दीपक चहरनं ४ षटकांत १३ धावांत ४ विकेट्स घेतल्या. 


पाहा विकेट्सवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : Deepak Chahar 4-13 in 4 overs; brillient Run out & catch from Ravindra Jadeja, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.