IPL 2021 : CSK vs KKR T20 Live : KKR have won the toss, CSK has rested Dwayne Bravo; Playing XI  | IPL 2021, CSK vs KKR T20 Live : कोलकातानं नाणेफेक जिंकली, चेन्नईनं ड्वेन ब्राव्होला विश्रांती दिली; जाणून घ्या Playing XI

IPL 2021, CSK vs KKR T20 Live : कोलकातानं नाणेफेक जिंकली, चेन्नईनं ड्वेन ब्राव्होला विश्रांती दिली; जाणून घ्या Playing XI

IPL 2021 t20 CSK vs KKR live match score updates Mumbai : कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सामना रंगणार आहे. KKRनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.  KKRच्या संघात दोन बदल केले - हरभजन व शाकिब OUT; कमलेश नागरकोटी व सुनील नरीन IN, तर CSKच्या संघात एक बदल - लुंगी एनगिडी IN, ड्वेन ब्राव्हो OUT पाहायला मिळाला. 

खेळ आकड्यांचा...

  • वानखेडे स्टेडियमवर आंद्रे रसेलला आयपीएल सामन्यांत षटकार खेचता आलेला नाही.  
  • फॅफ ड्यू प्लेसिसनं १ धाव करताच ट्वेंटी-२०त ६००० धावा करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा सहावा फलंदाज ठरेल. यापूर्वी, एबी डिव्हिलियर्स, डेव्हिड मिलर, कॉलिन इंग्राम, जेपी ड्यूमिनी आणि क्विंटन डी कॉक यांनी ही कामगिरी केली आहे.  
  • महेंद्रसिंग धोनीला आयपीएलमध्ये १५० बळी पूर्ण करण्यासाठी दोन गडी आज बाद करावे लागतील. त्याच्या नावावर १०९ झेल व ३९ स्टम्पिंग्स आहेत. 
  • दिनेश कार्तिकचा हा २००वा आयपीएल सामना आहे. धोनी व रोहित शर्मा यांच्यानंतर २०० सामने खेळणारा तो तिसरा खेळाडू आहे. 
  • सुरेश रैनानं आज दोन षटकार खेचल्यास तो द्विशतक पूर्ण करू शकले आणि दोन चौकारांसह ५०० चौकार नावावर करेल. शिवाय त्याला आयपीएमध्ये ५५०० धावांचा पल्ला गाठण्यासाठी ५२ धावांची गरज आहे.

 

  • कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) - शुबमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, इयॉन मॉर्गन, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, सुनील नरीन/ल्युकी फर्गुसन, पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी, वरुण चक्रवर्थी, प्रसिद्ध कृष्णा ( Match 15. Kolkata Knight Riders XI: S Gill, N Rana, R Tripathi, E Morgan, D Karthik, S Narine, A Russell, P Cummins, K Nagarkoti, V Chakaravarthy, P Krishna ) 
  • चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) - रॉबीन उथप्पा/ऋतुराज गायकवाड, फॅफ ड्यू प्लेसिस, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, सॅम कुरन, महेंद्रसिंग धोनी, लुंगी एनगिडी, शार्दूल ठाकूर, दीपक चहर  ( Match 15. Chennai Super Kings XI: F du Plessis, R Gaikwad, M Ali, S Raina, A Rayudu, MS Dhoni, R Jadeja, S Curran, S Thakur, D Chahar, L Ngidi) 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021 : CSK vs KKR T20 Live : KKR have won the toss, CSK has rested Dwayne Bravo; Playing XI 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.