IPL 2021 CSK vs DC Live T20 Score : Mohammad Kaif confirms Ishant Sharma has missed out today due to an injury | IPL 2021 : CSK vs DC T20 Live : सामन्याआधीच दिल्ली कॅपिटल्सला धक्का, महत्त्वाचा खेळाडू दुखापतग्रस्त

IPL 2021 : CSK vs DC T20 Live : सामन्याआधीच दिल्ली कॅपिटल्सला धक्का, महत्त्वाचा खेळाडू दुखापतग्रस्त

IPL 2021 : CSK vs DC  T20 Live Score Update : CSK vs DC Playing XI : महेंद्रसिंग धोनीचा ( MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्स ( CSK) आणि रिषभ पंतचा ( Rishabh Pant) दिल्ली कॅपिटल्स ( DC) यांच्यात आज आयपीएल २०२१मधील सामना होणार आहे. आयपीएलच्या मागच्या पर्वात CSK ( Chennai Super Kings) संघाला ७ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते, तर DC ( Delhi Capitals) नं उपविजेतेपद पटकावले होते. पण, या सहा महिन्यांच्या काळात दोन्ही संघात थोडाफार पण महत्त्वाचा बदल झाला आहे. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे स्पर्धेला मुकला आहे, तर सुरेश रैना चेन्नईच्या ताफ्यात परतला आहे. त्यामुळे आज चांगली चुरस रंगलेली पाहायला मिळेल. IPL 2021 : CSK vs DC T20 Live Score Update

चेन्नई विरुद्ध दिल्लीची आतापर्यंतची आकडेवारी पाहता चेन्नई सुपरकिंग्ज सरस ठरली आहे. आतापर्यंत चेन्नईनं दिल्लीविरुद्ध १५ लढती जिंकल्या आहेत. तर दिल्लीनं चेन्नईला ८ वेळा नमवलं आहे.  रिषभ पंतनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.  दिल्लीच्या संघात दोन खेळाडूंना पदार्पणाची संधी. टॉम कुरन व ख्रिस वोक्स हे आज खेळणार. दिल्लीसाठी १००वा आयपीएल सामना खेळणाऱ्या अमित मिश्राचा विशेष कॅप देऊन सन्मान करण्यात आला. १ वर्ष, १० महिने आणि २९ दिवसानंतर सुरेश रैना चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएल खेळणार आहे. ६९९ दिवसांनी तो मैदानावर उतरणार आहे.  CSK vs DC, CSK vs DC live score, IPL 2021

दिल्ली कॅपिटल्स (  DC playing XI vs CSK) - पृथ्वी शॉ, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, शिमरोन हेटमायर, मार्कस स्टॉयनिस, ख्रिस वोक्स, टॉम कुरन, आर अश्विन, अमित मिश्रा, ए खान 

चेन्नई सुपर किंग्स ( CSK playing XI vs DC) - फॅफ ड्यू प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, सॅम कुरन, ड्वेन ब्राव्हो, शार्दूल ठाकूर, दीपक चहर

इशांत शर्मा दुखापतग्रस्त
दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजीची भिस्त, ख्रिस वोक्स, मार्कस स्टॉयनिस, टॉम कुरन, ए खान, अमित मिश्रा व आर अश्विन यांच्यावर असणार आहे. इशांत शर्माला दुखापतीमुळे या सामन्यात खेळता येत नाही. इशांतनं ९० सामन्यांत ७२ विकेट्स घेतल्या आहेत. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021 CSK vs DC Live T20 Score : Mohammad Kaif confirms Ishant Sharma has missed out today due to an injury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.