ipl 2021 brendon mccullum hints sunil narine comeback in kolkata knight riders against csk shahrukh khan kkr | IPL 2021: 3 पैकी 2 सामन्यात पराभव, आता शाहरुखच्या KKRला वाचविण्यासाठी मैदानात उतरणार 'बाहुबली'

IPL 2021: 3 पैकी 2 सामन्यात पराभव, आता शाहरुखच्या KKRला वाचविण्यासाठी मैदानात उतरणार 'बाहुबली'

कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाची यंदाच्या आयपीएल सीझनमधील सुरुवात चांगली झाली. पहिलाच सामना केकेआरनं जिंकला. पण त्यानंतरचे दोन्ही सामने केकेआरनं गमावले आहेत. त्यामुळे संघाला आता पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर आणण्यासाठी संघात बदल केले जाणार असल्याचे संकेत प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमनं दिले आहेत. 

IPL 2021: वॉर्नर, विल्यमसननं मन जिंकलं! राशिद खानसोबत केला रमजानचा रोजा, पाहा Video  

मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात तर केकेआरनं हातचा सामना गमावला होता. मुंबई विरुद्धच्या पराभवानंतर केकेआरच्या संघाचा मालक अभिनेता शाहरुख खान यानंही नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यातही केकेआरला पराभवाला सामोरं जावं लागलं. कर्णधार इऑन मार्गनच्या नेतृत्वावर यावेळी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. एक कर्णधार म्हणून मैदानात घेण्यात आलेले निर्णय चुकीचे ठरल्याची टीका मॉर्गनवर केली जाऊ लागली. आता संघाचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनी संघात बदल करण्याचे संकेत दिले आहेत. चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्धच्या लढतीत कोलकाता नाइट रायडर्सच्या संघात वेस्ट इंडिजचा फिरकीपटू सुनील नरेनचा समावेश केली जाण्याची दाट शक्यता आहे. 

आयपीएलला तुरुंगवास म्हणणाऱ्या गोलंदाजाला भारताच्या दोन तडग्या फलंदाजांनी धु धु धुतलं!

बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात नरेनला संघात स्थान न देण्यात आल्यावरुनही केकेआरच्या संघ निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. "सुनील नरेन पहिल्या सामन्यासाठी फिट नव्हता. त्यामुळे तो खेळू शकला नाही. बंगळुरू विरुद्धच्या सामन्यापर्यंत नरेन फीट झाला होता. पण सामन्यात आम्ही शाकिबला संधी देण्याचा निर्णय घेतला होता. कारण शाकिब देखील एक अनुभवी आणि गोलंदाजीसह फलंदाजीतही चांगला खेळाडू आहे", असं ब्रेंडन मॅक्युलमनं म्हटलं. 

चेन्नई विरुद्धच्या सामन्यात होणार बदल
कोलकाताच्या खेळाडूंनी तिनही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली असं मॅक्युलमचं मत आहे. पण त्याचा निकाल आमच्या बाजूनं लागला नाही, असंही तो म्हणाला. मुंबईत आता आम्हाला वेगळ्या प्रकारच्या खेळपट्टीवर खेळावं लागणार आहे. त्यामुळे संघात काही बदल करावे लागतील. संघाला नव्या दमाच्या खेळाडूंची गरज आहे", असं मॅक्युलम म्हणाला. फिरकीपटू सुनील नरेन आता पूर्णपणे फिट झाला असून तो चेन्नई विरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. शाकिब अल हसनच्या जागी नरेनला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ipl 2021 brendon mccullum hints sunil narine comeback in kolkata knight riders against csk shahrukh khan kkr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.