रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) आणि मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) यांच्यातील सामना चुरशीचा होईल, याची सर्वांना अपेक्षा होती. पण, तो सुपर ओव्हरमध्ये जाईल, असा विचार कुणी केलाच नसावा. मुंबई इंडियन्सनं ( MI) दमदार खेळ करताना 201 धावांपर्यंत मजल मारली, पण त्यांना विजय मिळवता आला नाही. सुपर ओव्हरमध्ये नवदीन सैनीनं ( Navdeep Saini) केलेल्या टिच्चून माऱ्यानं MIचा पराभव पक्का केला. या विजयानंतर बॉलिवूड अभिनेत्री अन् RCBचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याची पत्नी अनुष्का शर्मानं ( Anushka Sharma) लिहिलेली पोस्ट व्हायरल झाली आहे. 

प्रथम फलंदाजीला आलेल्या RCBनं आरोन फिंच ( Aaron Finch), देवदत्त पडीक्कल ( Devdutt Padikkal) आणि एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) यांच्या अनुक्रमे 52, 54 आणि 55 धावांच्या जोरावर 3 बाद 201 धावांचा डोंगर उभा केला. मुंबई इंडियन्सला सुरुवातीला बसलेल्या धक्क्यानंतर RCBचा विजय पक्का मानला जात होता. MIला अखेरच्या पाच षटकांत म्हणजेच 30 चेंडूत 90 धावा हव्या होत्या. यंदाच्या आयपीएलमध्ये पहिलाच सामना खेळणाऱ्या इशान किशन ( Ishan Kishan) आणि किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) यांनी सामना खेचून आणला. इशान 58 चेंडूंत 2 चौकार व 9 षटकार खेचून 99 धावांवर माघारी परतला अन् सामन्यात पुन्हा चुरस निर्माण झाली. 

पोलार्डला अखेरच्या चेंडूवर 5 एवजी चारच धावा करता आल्यानं MI ला 5 बाद 201 धावांवर समाधान मानावे लागले. पोलार्डनं 24 चेंडूंत 3 चौकार व 5 षटकार खेचून नाबाद 60 धावा केल्या. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. RCBच्या नवदीप सैनीनं ( Navdeep Saini) टिच्चून मारा करताना MIला 7 धावांवर रोखले आणि विराट कोहली व एबी यांनी हे लक्ष्य पार करून RCBला विजय मिळवून दिला. 

अनुष्कानं लिहिलं की, एका गर्भवती महिलेसाठी हा सामना खूपच रोमहर्षक आहे..''


 

English summary :
The RCB vs MI match in the IPL 2020 gave fans a roller-coaster of an experience

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2020: Too exciting a game for a pregnant lady: Anushka Sharma reacts to RCB vs MI Super Over thriller 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.