IPL 2020 : Munde baaro **** - KL Rahul’s Kannada abuse in IPL 2020 goes viral | IPL 2020 DC vs KXIP : Munde baaro **** , लोकेश राहुलने वापरले अपशब्द; सोशल मीडियावर Video Viral

IPL 2020 DC vs KXIP : Munde baaro **** , लोकेश राहुलने वापरले अपशब्द; सोशल मीडियावर Video Viral

दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) यांच्यातला सामना चुरशीचा झाला. DCच्या 8 बाद 157 धावांचा पाठलाग करणाऱ्या KXIPला अखेरच्या चेंडूवर एक धाव घेता न आल्यानं त्यांनाही 8 बाद 157 धावांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये DCने बाजी मारली. पण, या सामन्यात KXIPला दिलेल्या Short Runचा फटका बसला आणि त्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. त्यात आता KXIPचा कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) यानं सहकारी खेळाडूला अपशब्द वापरल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ( RCB vs SRH Live Score & Updates 

IPL 2020 : मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स सामन्यानं केला Record Break; जय शाह यांची घोषणा

KXIPच्या ताफ्यात राहुलसह, करुण नायर, मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि मयांक अग्रवाल या कर्नाटकच्या खेळाडूंचा समावेश आहे. त्यात KLनं क्षेत्ररक्षण करताना कन्नड भाषेत अपशब्द वापरल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. KL क्षेत्ररक्षणात फाईन लेगला खेळाडूला उभा राहण्याची सुचना करत होता, परंतु त्या दरम्यान त्यानं कन्नड भाषेत अपशब्द वापरला.  ( RCB vs SRH Live Score & Updates 


अपांयरच्या त्या चूकीच्या निर्णयाला KXIPचं चॅलेंज
मैदानी पंच नितीन मेनन यांनी ‘शॉर्ट रन’ दिल्यानेच दिल्लीविरुद्ध पंजाबचा पराभव झाला, असे मानले जात आहे. किंग्ज पंजाबने या वादग्रस्त निर्णयाविरुद्ध अपील केले. दुसरीकडे माजी खेळाडूंनी अचूक निर्णयासाठी अद्ययावत तंत्राचा उपयोग व्हावा, अशी मागणी केली आहे.

टीव्ही फुटेजनुसार, स्क्वेअर लेग पंच मेनन यांनी १९ व्या षटकात तिसऱ्या चेंडूवर ख्रिस जॉर्डन याला ‘शॉर्ट’ रन बाब संकेत दिले. जॉर्डनची बॅट क्रीझच्या आत असल्याचे रिप्लेमध्ये दिसत होते. मेनन यांच्या मते मात्र जॉर्डन क्रिझपर्यंत पोहोचला नव्हता. यामुळे मयंक अग्रवाल आणि पंजाबच्या धावसंख्येत केवळ एकच धाव जोडण्यात आली. तांत्रिक साक्ष असताना निर्णय मात्र बदलण्यात आला नाही. अखेरच्या षटकात पंजाबला १३ धावांची गरज होती.

पहिल्या तीन चेंडूंवर मयांकने १२ धावा केल्या. पंजाब संघ एका धावेने माघारला आणि सामना ‘टाय’ झाला. अखेर सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने बाजी मारली. यावर किंग्ज पंजाबचे सीईओ सतीश मेनन म्हणाले, ‘आम्ही रेफ्रीकडे अपील केले. ही एक धाव आम्हाला ‘प्ले आॅफ’पासून वंचित रोखू शकते. पराभव हा पराभव असतो. हा प्रकार अयोग्य आहे.’अपिलावर निर्णय येण्याची शक्यता कमीच आहे. आयपीएल नियम २.१२ नुसार (पंचांचे निर्णय) पंचांच्या निर्णयावर त्वरित आक्षेप घेतल्यास निर्णय बदलणे शक्य असते. साधारणपणे पंचाचा निर्णय अंतिम समजला जातो.

प्रिती झिंटा काय म्हणते?
''मी मोठ्या उत्साहानं येथे दाखल झाले, सहा दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये राहिले आणि 5 वेळा आनंदानं कोरोना चाचणी करून घेतली. पण, त्या एका शॉर्ट धावेनं मला खुप दुःख पोहोचवले. जर तंत्रज्ञानाचा वापरच केला जाणार नसेल, मग त्याचा काय अर्थ? BCCI नं नवा नियम आणण्याची हीच वेळ आहे. दरवर्षी असं होता कामा नये,''असे ट्विट तिनं केलं.  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2020 : Munde baaro **** - KL Rahul’s Kannada abuse in IPL 2020 goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.