IPL 2020 : Jofra Archer clocks 152 kmph, hustles & harries KKR batsmen | IPL 2020 : जोफ्रा आर्चरनं टाकला सर्वात वेगवान चेंडू; वेग इतका की फलंदाज झाला थक्क 

IPL 2020 : जोफ्रा आर्चरनं टाकला सर्वात वेगवान चेंडू; वेग इतका की फलंदाज झाला थक्क 

राजस्थान रॉयल्सचा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चरने या सत्रात सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम केला आहे. सर्वात वेगवान २० चेंडूपैकी १६ चेंडूत जोफ्रा आर्चरने टाकले आहेत.  आर्चरने सर्वात वेगवान चेंडू १५२.३ प्रति किमी तास या वेगाने टाकला आहे. त्या खालोखाल त्यानेच १५०.८२ आणि १५०.७५ या वेगाने चेंडू टाकले आहे. त्याशिवाय एन्रिच नॉर्टत्जे, जोश हेझलवुड आणि नवदीप सैनी यांनी सर्वात वेगवान चेंडू टाकले आहेत.

नवदीप सैनी याने १४७.९२ किमी प्रति तास या वेगाने चेंडू टाकले आहेत. या यादीत फक्त सैनी हा एकटाच भारतीय गोलंदाज आहे. त्या व्यतिरिक्त एकाही गोलंदाजाला या वेगाने चेंडू टाकता येणार आहे. आयपीएल २०१९मध्ये कागिसो रबाडा (दिल्ली कॅपिटल्स) याने १५४.२३ किमी प्रति तास या वेगाने चेंडू टाकला होता. त्यासोबतच त्यानेच सर्वात वेगवान चार चेंडू टाकले होते. या सोबतच चेन्नई सुपर किंग्ज च्या जोश हेझलवुडने या यादीत स्थान मिळवले आहे. त्यानेही १४७.३२ च्या गतीने चेंडू टाकला आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2020 : Jofra Archer clocks 152 kmph, hustles & harries KKR batsmen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.