- स्वदेश घाणेकर

Indian Premier League ( IPL 2020) युवा खेळाडूंनी आपला दम दाखवला आहे. संजू सॅमसन, राहुल टेवाटिया, इशान किशन, शिवम मावी, कमलेश नागरकोटी, शुबमन गिल, टी नटराजन आदी खेळाडूंनी आतापर्यंत सर्वांचे लक्ष वेधले आहे. कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यातल्या सामन्यात 2018च्या युवा वर्ल्ड कप संघातील सदस्य असलेल्या गिल, मावी आणि नागरकोटी यांनी दर्जेदार कामगिरी करताना टीम इंडियाचे भविष्य उज्वल हातात आहे, हे सिद्ध केले. या तिघांनीही अविश्वसनीय कामगिरी करून KKRच्या विजयात खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा उचलला. शिवम मावीला मॅन ऑफ दी मॅच पुरस्कारानं गौरविण्यात आलं. पण, या सामन्यात नागरकोटीनं ( Kamlesh Nagarkoti ) सर्वांचे लक्ष वेधले. गोलंदाजीतच नव्हे, तर क्षेत्ररक्षणातही त्यानं अफलातून कामगिरी करून दाखवली. 

आपण अशा प्रकारे IPLमध्ये अशी कामगिरी करून दाखवू हा विश्वास नागरकोटीनं कधीच गमावला होता, परंतु भारताची महान फलंदाज राहुल द्रविड ( Rahul Dravid) याच्या मार्गदर्शनानंतर राजस्थानच्या 20 वर्षीय गोलंदाजानं दमदार कमबॅक केले. नागरकोटीला ( Kamlesh Nagarkoti) 30 महिने दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर रहावं लागलं, बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचार घेत असताना युझवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal) एकदा त्याची फिरकी घेताना म्हटलं होतं की, भाई, यहाँ पे ही सेटल हो गये क्या?, आपने घर खरीदा है क्या यहाँ पे? ( इथेच सेटल झाला आहेस का? इथे तू घर खरेदी केलं आहेस का?). त्याच्या या बोलण्यावर तो हसायचा, परंतु मनातून तो खचत चालला होता. त्याला चिअर करण्यासाठी चहलचा तो प्रयत्न होता. त्याचवेळी त्याचे जोडीदार पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) आणि शुबमन गिल ( Shubman Gill) हे मैदान गाजवत होते. त्यामुळे आपली कारकीर्द संपली, असंच नागरकोटीला वाटू लागले होते. मनात नकारात्मक भावना निर्माण होत होती.

पण, बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत राहुल द्रविडनं त्याला या नकारात्मकतेतून बाहेर काढले. वयाच्या 19व्या वर्षी त्याला दुखापत झाली. तो ना खेळू शकत होता, ना अभ्यास करत होता, त्यात घरच्यांपासूनही तो दूर होता. त्यामुळे नकारात्मकता वाढतच चालली होती. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व युवा खेळाडू घडले होते आणि त्यामुळे नागरकोटीतील टॅलेंट द्रविड ओळखून होता. द्रविडला नागरकोटीची ही अवस्था जेव्हा समजली तेव्हा त्यानं त्याला मार्गदर्नश केलं.  द्रविड म्हणाला, आयपीएलचे एक-दोन पर्व खेळता न आल्यानं आयुष्य संपलं, असा विचार करू नकोस. तुला भारतासाठी खेळायचं आहे. त्यासाठी तुला कणखर बनावं लागेल. पॅट कमिन्सलाही कसोटी पदार्पणानंतर सहा वर्ष दुखापतीमुळे मैदानावर उतरता आले नव्हते आणि त्यानंतर त्यानं केलेलं कमबॅक सर्वांनाच माहित्येय...


द्रविडचं हे मार्गदर्शन त्यानं कायम लक्षात ठेवले आणि आता तो टीम इंडियात दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे.

English summary :
IPL 2020 : KKR’s Kamlesh Nagarkoti says thanks to Rahul Dravid after match-winning spell vs RR, know reason 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2020 : Due to injury Kamlesh Nagarkoti started thinking negative thoughts, but Rahul Dravid's motivation speech and...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.